आलिया भट्टचा लुक कॉपी केल्यानं ट्रोल झालेल्या माहिरा शर्मानं ‘ट्रोलर्स’ना दिलं ‘असं’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 ची स्पर्धक माहिरा शर्मा हिला काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सचा सामना करावा लागला. माहिरानं आलियासारखा एक ड्रेस घातल्यानं ती ट्रोल झाली होती. अनेकांनी तिला गरीबांची आलिया भट्ट असं म्हटलं होतं. यावर आता माहिरा शर्माची प्रतिक्रिया आली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार माहिरा म्हणाली, “आलियानं जे कंलं मीही तेच ट्राय केलं. मला नाही माहिती की, यात ट्रोल करण्यासारखं काय आहे. आलिया भट्ट युथ आयकॉन आहे. जे तिनं एकदा ट्राय केलं तेच मी जर ट्राय केलं तर त्यात चुकीचं काय आहे. मला तिच्याकडून प्रेरणा घ्यायला आवडेल.”

माहिराच्या ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर तिनं डेझी ब्लू कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. या ड्रेसवर तिनं फिशटेल हेअरस्टाईल केली होती. माहिराचा पूर्ण लुक आलियासारखाच होता. आलियानं एका अवॉर्ड फंक्शनमध्ये लाईट पीच कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. माहिराचा लुक सेम आलिया सारखाच होता.

View this post on Instagram

Happy IIFA to me 😬

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

बिग बॉसमध्ये माहिरा टॉप 7 मध्ये होती. माहिरा आणि पारस छाबडा यांची बाँडिंग लोकांना खूप आवडली होती. चाहत्यांचं म्हणणं होतं की, पारसमुळेच माहिरा शोमध्ये टिकून आहे. पारसशिवाय ती काहीच नाही. हे ऐकल्यानंतर ती खूप अपसेट झाली होती.

 

 

You might also like