Bigg Boss 13 : शहनाज गिल आणि पारस छाबडा करणार लग्न ? ‘इथं’ पहा ट्रेलर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 हा शो आधीपासूनच वादात राहिला आहे. लवकरच बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे. अशातच आता समजत आहे की, बिग बॉसचे स्पर्धक शहनाज गिल आणि पारस छाबडा लग्न करणार आहेत. याचा एक ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही बिग बॉसच्या शोमध्ये पाहिलं असेल की, बिग बॉसनं शहनाजला कंफेशन रुममध्ये बोलावलं होतं. यानंतर त्यानं शहनाजला लग्नाचं कार्ड दिलं होतं. बिग बॉसनं हे घरात वाटायला सांगितले होते.

या प्रकरणी बोलताना समलान खानही म्हणाला होता की, “बिग बॉस शो संपल्यानंतर एक शो येणार आहे.” सलमानच्या बोलण्यावरून असं जाणवलं होतं की, कोणता तरी टीव्ही शो येणार आहे. हा शो लग्नावर आधारीत असणार आहे. अशातच शहनाज आणि पारस यांच्या लग्नाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर हे निश्चित झालं होतं की, एक नवीन टीव्ही शो येत आहे. पारस आणि शहनाज या शोचा हिस्सा असणार आहेत.

या रिअ‍ॅलिटी शोचं नाव मुझसे शादी करोगे असणार आहे. कलर्स टीव्हीवर हा शो सुरू होणार आहे. प्रोमो व्हिडीओत दिसत आहे की, पारस आणि शहनाज वर आणि वधुच्या लुकमध्ये आहेत. बिग बॉस संपल्यानंतर हे दोघं आपल्यासाठी पार्टनर शोधणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की, पारस आणि शहनाज लग्न करणार आहेत तर असं अजिबात नाहीये. दोघंही आपल्यासाठी वेगळे पार्टनर शोधणार आहेत.

You might also like