आश्चर्यकारक खुलासा ! ‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकाच्या 150 गर्लफ्रेंड्स, आजही त्याच्यावर तरुणी ‘फिदा’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 चा स्पर्धक पारस छाबडा घरात एन्ट्री केल्यापासूनच टॉक ऑफ द टाऊन बनला आहे. शोमध्ये पारस छाबडा आपल्या फ्लर्टी नेचरमुळे खूपच चर्चेत येताना दिसत आहे. शोमधील माहिरा आणि शहनाजसोबतची त्याची मैत्री, बाँडिंग सर्वकाही प्रेक्षकांना खूप आवडत आहे. बिग बॉसच्या घरात स्वत:ला सिंगल सांगणारा पारस छाबडा खऱ्या आयुष्यात अ‍ॅक्ट्र्रेस आकांक्षा पुरीला डेट करत आहे.

पारसबद्दल आणखी सांगायचे झाले तर, पारस एमटीव्ही शो स्प्लिट्सविलाचा विनर आहे. त्या शोमध्येही पारसचं अनेक मुलींशी ट्युनिंग पहायला मिळालं होतं. पारस छाबडाच्या 150 गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत. खु्द्द पारसनेच हा खुलासा बिग बॉसच्या घरात केला होता. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, पारस शेफाली बग्गासोबत आपली लव्ह लाईफ शेअर करत आहे.

पारस सांगत आहे की, स्प्लिट्सविला जिंकल्यानंतर त्याच्या 150 गर्लफ्रेंड्स होत्या. त्यातील काही मुली त्याच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्याला गिफ्ट देत होत्या. आजही त्याने आपल्या गर्लफ्रेंडला सोडलं तर कोणतीही मुलगी त्याला भेटेल. पारस म्हणतो की, त्याच्या चाहत्यांचंही त्याच्यावर खूप प्रेम आहे.

पारसने आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पारस म्हणतो, “माझी जी पहिली गर्लफ्रेंड आहे तिचं लग्न झालं आहे आणि तिला मुलगाही आहे. परंतु आजही तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी बिग बॉसमध्ये आल्यानंतरही ती खूप एक्सायटेड आहे. ती मला खूप चांगलं ओळखते.”

पुढे तो म्हणतो, “जेव्हा मी माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला भेटतो तेव्हा तेव्हा आजही मला पहिल्यासारख्या फीलिंग्स जाणवतात. मी जर कधी परेशान असेल तर तिला लगेच ते जाणवतं.”

 

Visit : policenama.com

 

You might also like