‘बिग बॉस 13’ मध्ये अमिषा पटेल ‘पोलखोल’ करणार (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा 13 वा सीजन 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नुकतीच सलमानने बिग बॉस स्टार एक्स्प्रेस लाँच केली. वारंवार बिग बॉसचे प्रोमो व्हिडीओज समोर येतान दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमो व्हिडीओत अमीषा पटेलही दिसली. बिग बॉसमध्ये ती स्पेशल रोल प्ले करताना दिसणार आहे. या व्हिडीओत तशी हिंट तिने दिली आहे.

समोर आलेल्या प्रोमो व्हिडीओत अमीषा हातात हंटर घेऊन दिसत आहे. यात ती म्हणत आहे की, बिग बॉसमध्ये अनेकांचं सिक्रेट रिव्हील करताना ती दिसणार आहे. तिने आपल्या रोलविषयी थोडासाच क्लू दिला आहे. यात ओपनिंग डेसाठी सस्पेंसही ठेवला आहे.

याशिवाय बिग बॉसच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सलमान खान चिडचिड करताना दिसून आला. फोटोग्राफर्स सतत फोटो काढत असल्याने तो नाराज झाला. कारण त्याला त्याचे काम करण्यात व्यत्यय येत होता.

रिपोर्टनुसार, यावेळी बिग बॉसमध्ये सर्वकाही नॉनस्टॉप स्पीडने होणार आहे. प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे की शोच्या स्पर्धकांना अवघ्या 4 आठवड्यात फिनालेमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळेल. बिग बॉस 13 आपल्या मागील सीजनपेक्षा किती वेगळा आहे हे पाहण्यासारखं असेल. काही बदलांविषयी तर आधीच सांगण्यात आलं आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like