‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला आई होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कांटा लगा हे जुनं गाणं 2002 साली रिमिक्सच्या स्वरूपात प्रसिद्ध झालं आणि खूप गाजलं. या गाण्यात काम करणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला या गाण्यामुळं रातोरात स्टार झाली. आजही हे गाणं तेवढंच फेमस आहे. या गाण्यानंतर शेफाली कांटा लगा गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. आता अशी माहिती मिळत आहे की शेफाली आई होणार आहे.

शेफाली आई होणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर थोडं थांबा. कारण शेफाली प्रेग्नंट नसून ती मूल दत्तक घेणार आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, शेफाली आणि तिचा पती पराग त्यागी यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना शेफाली म्हणते, “वयाच्या 10-11 व्या वर्षी मला मूल दत्तक घेण्याचा अर्थ समजला. तेव्हापासून मला मूल दत्तक घ्यायचं होतं. खरं तर जेव्हाची तुम्हाला स्वत:ची मुलं असतात तेव्हा असा निर्णय घेणं फार कठिण असतं. समाजाचा दबाव देखील असतो. परंतु मी आणि पराग आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्हाला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. सध्या बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दत्तक घेताना कागदोपत्री व्यवहार फार नसतो. मात्र ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.” असं तिनं एक मुलाखतीत सांगितलं आहे.

शेफाली बिग बॉसच्या तेराव्या सीजनमध्ये स्पर्धक होती. परंतु ती अलीकडेच घरातून बाहेर पडली आहे. सध्या शेफालीची खूप चर्चा सुरू आहे. तिचा पती पराग त्यागी हादेखील छोट्या पडद्यावरील अभिनेता आहे. यापूर्वी शेफालीनं हरमीत गुलजार सोबत लग्न केलं होतं परंतु काही कारणामुळं ते वेगळे झाले. यानंतर शेफालीनं 2015 मध्ये परागसोबत दुसरं लग्न केलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like