Bigg Boss 13 : शिल्पा शेट्टीच्या योग सेशनमुळं घरातल्यांना फुटला ‘घाम’, शहनाजनं दिल्या ‘फनी’ पोज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसच्या ग्रँड फिनालेची चाहते आतुरतेनं वाट पहात आहेत. आसिम रियाज, रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला आणि पारस छाबडा हे बिग बॉसचे टॉप 4 कंटेस्टेंट्स आहेत. या चारही स्पर्धकांनी फिनालेमध्ये आपली जागा कायम केली आहे. शो जिंकण्यासाठी स्पर्धक एकमेकांना काट्याची टक्कर देताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टीनं घरातल्यांचा घेतला योगा क्लास
फिनालेपूर्वी स्पर्धकांचा प्रेशन कमी करण्यासाठी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी या आठवड्यात घरात धमाकेदार एन्ट्री करणार आहे. शिल्पा बिग बॉसच्या घरात आल्यानंतर स्पर्धकांचा योगा क्लास घेताना दिसणार आहे. या क्लासमध्ये घरातील सर्वजण मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरात आल्यानंतर शिल्पा स्पर्धकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योगमुद्रा करवून घेणार आहे. सर्वच स्पर्धक विनोदी पद्धतीनं योगा करताना दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरातील एंटरटेनर शहनाज गिल आपल्याच अंदाजात योगा करताना दिसणार आहे. शहनाज हा विनोदी योगा पाहून शिल्पासहित घरातील इतर सदस्यही पोट धरून हसतात. फिनालेच्या तणावाआधी स्पर्धक शिल्पा शेट्टीसोबत योगा करताना खूप खुश आणि रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. सध्या शिल्पाचा एक प्रमोशनल व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.