Bigg Boss 13 : ‘सिद्धार्थ डे’नं कोएना मित्राला म्हटलं ‘गल्लीतली आंटी’ ! सलमान खानला आवडली ‘शहनाज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसच्या घरात स्पर्धक खूप मस्ती करताना दिसत असतात. गप्पा मारताना अभिनेत्री कोएना मित्राने सिद्धार्थ डेवर उद्धटपणाचा आरोप केला. कोएना म्हणाली, “सिद्धार्थला बोलण्याची पद्धत नाही. कुठे कधी आणि काय बोलावं हे त्याला कळत नाही. कोएना त्याच्या जॉबलेसच्या वक्तव्याने नाराज होती. सिद्धार्थने म्हटले होते की, ज्यांच्याकडे काम नसतं ते बिग बॉसमध्ये येतात.

https://www.instagram.com/p/B3SOxtKFL6K/?utm_source=ig_embed

यावेळी विकेंडच्या भागात हिना खानही आली होती. हिना सुपरमार्केट मॅनेजर म्हणून येत असते. यादरम्यान घरातील सदस्य एकतर घरातील आवश्यक वस्तू घेऊ शकतो किंवा घरून आलेला मेसेज ऐकू शकतो. घरातील सदस्य अशा वेळेस खूपच इमोशनल होऊन जातात. देवोलिना आपल्या आईचा मेसेज सोडून घरातलं सामान घेते.”

टास्क दरम्यान रश्मी देसाईने सिद्धार्थ डेला म्हटलं होतं की, तू माझा बाप नाहीस. सर्वजण त्याच्या जॉबलेसच्या वक्तव्यामुळे नाराज होते. सलमानने सिद्धार्थला समजावले होते की, एखाद्याच्या कामाला घेऊन बोलणं चुकीचं आहे. सिद्धार्थ डेने टास्क दरम्यान कोएनाला गल्लीतली आंटी म्हटलं. याशिवाय सलमानला मात्र शहनाजच्या बोलण्याचा अंदाज खूप आवडला. हिनाने सांगितले की, पारस छाबडा आणि शहनाजमध्ये चांगलं ट्युनिंग होणार आहे.”

Visit : Policenama.com