Bigg Boss 13 : आयुष्यात पुन्हा ‘यांचा’ चेहरा पाहण्याची सिद्धार्थ शुक्लाची इच्छा नाही, शहनाजला लागू शकतो ‘झटका’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 रिअ‍ॅलिटी शो आता संपला आहे तरीही चाहत्यांमध्ये शोची चर्चा अजूनही सुरू आहे. घराच्या बाहेर सदस्यांचं आयुष्य कसं चाललं आहे याबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. जर सिद्धार्थ शुक्लाचा विषय असेल या हँडसम हंकबद्दल सर्वांनाच जाणू घ्यायचं आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बिग बॉस 13 चा विनर सिद्धार्थ शुक्लानं आपल्या चाहत्यांच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

एका मुलाखतीत सिद्धार्थला विचारण्यात आलं की, घराच्या बाहेर आल्यानंतर आता त्याला कोणासोबत मैत्री ठेवायला आवडेल ? यावर उत्तर देताना सिद्धार्थनं चकित करणारा खुलासा केला आहे. सिद्धार्थ म्हणाला, “माझ्या मनात कोणाबद्दलही निगेटीव्हिटी नाही. बाहेर आल्यानंतर मी सर्वकाही विसरलो आहे. ही गोष्ट वेगळी आहे की, बिग बॉस 13 च्या कोणत्याही सदस्याच्या टचमध्ये मी राहणार नाही. कोणी माझ्याशी बोलत असेल तर मी त्याच्या सोबत नक्की बोलेल.”

पुढे सिद्धार्थ म्हणाला, “असं नाही की, मी कोणावर नाराज आहे. परंतु बोलण्यासाठी मी कधीच पुढाकार घेणार नाही. समोरून कॉल आता तर मी त्याला नक्कीच उत्तर देत असतो.”

सिद्धार्थ पुढे बोलताना म्हणतो, “माझी एक बेस्ट फ्रेंड आहे. ही मुलगी मला 19 वर्षांपासून ओळखते. मी तिला फक्त तिला वाढदिवसालाच कॉल करतो. इतर वेळी मलाच तिचा कॉल येतो. असं असतानाही तिला माझ्याशी बोलायला आवडतं. माझ्या या सवयीपासून तिला काहीच प्रॉब्लेम नाही. मला गॉसिप आवडत नाही. हेच कारण आहे की, मी मोकळ्या वेळेत टीव्हीवर बातम्या पहात असतो.” सिद्धार्थच्या उत्तरावरून स्पष्ट होत आहे की, त्याला कोणत्याही सदस्यासोबत बोलण्याची इच्छा नाही.

You might also like