Bigg Boss 14 : यंदा ‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘या’ चर्चित सेलिब्रिटींची एन्ट्री ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस हा शो जेवढा वादग्रस्त आहे तेवढाच लोकप्रियसुद्धा आहे. बिग बॉसचा 14 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा शो सुरू होणार आहे. सर्वांनाच उत्सुकता आहे की, यावेळी बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रिटी दिसणार आहेत. यंदाच्या सीजनसाठी 3 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार बिग बॉस 14 साठी टीव्ही अभिनेत्री निया शर्मा, विवियन डिसेना आणि शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन यांच्या नावांची खूप चर्चा होत आहे.

निया शर्माबद्दल थोडक्यात…
निया शर्मा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित अभिनेत्री आहे. तिनं लोकप्रिय मालिका नागिनमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर आशियातील सर्वात सेक्सी महिल्यांच्या यादीत तिनं 2 वेळा स्थान मिळवलं आहे.

विवियन डिसेनाबद्दल थोडक्यात…
विवियननं शक्ती- अस्तिवत्व के एहसास की, प्यार की ये एक कहानी, मधुबाला, अशा अनेक मालिकेत काम केलं आहे.

अध्ययन सुमनबद्दल थोडक्यात…
अध्ययन सुमन राज 3 सिनेमात झकळला आहे. याच सिनेमाच्या शुटींगदरम्यान अध्ययन आणि कंगना रणौत यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like