विमानतळावर चूकीच्या टर्मिनलवर पोहोचली अर्शी खान, पुढे झाले असे काही (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉसची 14 स्पर्धक अर्शी खान मुंबई विमानतळावर हजर झाली होती. ती टर्मिनल 2 वर आली होती. त्यानंतर तिने फोटोग्राफरला पोजही दिल्या, यानंतर तिला समजले की तिचे विमान टर्मिनल 1 पासून आहे. त्यानंतर ती घाईघाईने आपल्या कारमध्ये बसली. हे संपूर्ण दृश्य कॅमेर्‍यामध्ये कैद झाले आणि आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अर्शी खानने सांगितले की, ती होळी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गोव्याला जात आहे आणि ती चुकून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर पोहोचली, व्हिडिओमध्ये तिला म्हणताना ऐकले जाऊ शकते की, ‘अरे हे टर्मिनल 2 आहे का, माझी फ्लाइट टर्मिनल 1 वर आहे’. यानंतर अर्शी तिच्या गाडीकडे निघाली जी त्यांना सोडण्यासाठी आली होती आणि ती तिच्या कारमध्ये येऊन बसली. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

अर्शी खानने नुकतेच मुंबईत स्वत: चे नवीन घर विकत घेतले आहे. यासाठी तिने सलमान खानचे आभार मानले. ती म्हणाली, ‘मला कसलेही काम नव्हते, त्यामुळे मी पैसे कसे गोळा करीन याचा विचार करत होते, माझ्याकडे काही कार्यक्रम होते, मी काही चित्रपट केले आणि बिग बॉस 14 मुळे मलाही मोठी मदत मिळाली. मला मुंबईत घर विकत घ्यायचे होते जे माझे स्वप्न होते आणि सलमान खानने मला मदत केल्याबद्दल त्यांची आभारी आहे.’

दरम्यान, अर्शी खान बिग बॉस 14 मध्ये खूपच सक्रिय होती. तिने चाहत्यांचे मनोरंजनही केले, तिचे आणि विकास गुप्ताचे कार्यक्रमात जोरदार भांडणही झाले. विकासने अर्शीला स्विमिंग पूलमध्ये ढकलले. ज्यामुळे विकास गुप्ताला शो सोडावा लागला होता, मात्र नंतर तो शोमध्ये परत आला.