Photos : जेव्हा ‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ता आणि अभिनेता पार्थ समथान यांचे बेडरूम फोटो झाले होते ‘लीक’ ! हादरली होती टीव्ही इंडस्ट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अटेंशन घेणारा विकास गुप्ता (Vikas Gupta) आपल्या पर्सनल लाईफमुळं अनेकदा चर्चेत आला आहे. त्याच्या आयुष्यातील किस्से कधी जास्त लपून राहिले नाहीत. विकास गुप्ता आणि टीव्ही ॲक्टर पार्थ समथान (Parth Samthaan) यांच्या नात्यानं आणि त्यांच्या जवळीकतेनंही अनेकदा अटेंशन घेतलं आहे. लोक तेव्हा जास्त अवाक् झाले होते जेव्हा दोघांचे बेडरूममधील काही आक्षेपार्ह फोटो लीक झाले होते. आज त्यांच्या वादग्रस्त नात्यावर एक नजर टाकणार आहोत. त्यांच्या नात्याबद्दलचा प्रवासही थोडक्यात पाहणार आहोत.

या मालिकेत झाली होती ‘विकास-पार्थ’ची भेट
पार्थनं कैसी ये यारियां या मालिकेतून खूप अटेंशन घेतलं होतं. विकास गुप्ता या शोचा प्रोड्युसर होता. याच शोच्या सेटवर दोघांची भेट झाली होती आणि मैत्रीही.

प्रत्येक इव्हेंटमध्ये सोबत दिसत होते ‘विकास-पार्थ’
दोघानं नातं एवढं जवळचं झालं होतं की, कोणत्याही इव्हेंटला दोघं सोबतच हजेरी लावत असत. दोघांची बाँडिंगही स्पष्ट दिसत होती.

पार्थनं विकासवर केले होते गंभीर आरोप
काही वर्षांपूर्वी पार्थनं विकास गुप्तावर चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप केला होता. यानंतरच दोघांबद्दल अनेक गोष्टी समोर येताना दिसल्या.

अचानक लीक झाले होते पार्थ-विकसाचे आक्षेपार्ह फोटो
दोघांमध्ये पैशांवरून काही वाद सुरू असतानाच अचानक त्यांचे बेडरूममधील काही आक्षेपार्ह फोटो समोर आले होते जे सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर दोघांचे चाहते अवाक् झाले होते. यामुळं टीव्ही इंडस्ट्रीही हादरली होती. अनेकांना धक्का बसला होता.

वेळोवेळी प्रेम व्यक्त करायचे ‘विकास-पार्थ’
अशी कोणतीच वेळ नव्हती जेव्हा त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं नसेल. त्यांनी दुनियेची कधी पर्वा केली नाही.

एकता कपूरनं केला होता चकित करणारा खुलासा
एकता कपूरनं दोघांबद्दल बोलताना सांगितलं होतं. की, दोघं एकमेकांना चांगलं ओळखतात. दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांबद्दल अशा तशा बातम्या समोर आल्यानंतरही दोघं सोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. मी एवढ्या खात्रीनं यासाठी सांगत आहे कारण त्यावेळी मीही तिथंच होते.

मित्राच्या पार्टीत झालं होतं दोघांचं पॅचअप
काही महिन्यांपूर्वीच पार्थ आणि विकास यांचं एका कॉमन मित्राच्या पार्टीत पॅचअप झालं होतं. परंतु काही दिवसांनी पुन्हा अशी बातमी समोर आली की, दोघांनी एकमेकांपासून अंतर राखलं आहे.