Bigg Boss 14 Contestants List : सलमान खानच्या शोमध्ये पुन्हा दिसणार सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान आणि मोनालिसा, जाणून घ्या कारण

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कलर्सचा सर्वाधिक लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ चा 14 वा सीजन सुरू होणार आहे. हा शो सुरू होण्याबद्दल गेल्या कित्येक दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरु होत्या, पण शोचा प्रीमियर कधी होईल याविषयी सर्व अटकळ संपवत कलर्सने अधिकृत घोषणा केली आहे. कलर्सनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या 14 व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर पुढील महिन्याच्या 3 तारखेपासून म्हणजे 3 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. यासह या शोशी संबंधित आणखी एक रंजक माहिती समोर येत आहे की, या वेळी केवळ नवीन स्पर्धकच नाही, तर जुने स्पर्धकदेखील या शोमध्ये दिसू शकतात.

माहितीनुसार, बिग बॉस 14 मध्ये केवळ नवीन चेहरेच नाही तर जुने चेहरेही दिसणार नाहीत, ज्यामुळे बिग बॉसच्या घरात मनोरंजनही वाढेल. ‘सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान आणि मोनालिसा’ अशी चर्चेत असलेल्या जुन्या स्पर्धकांची नावे आहेत. गेल्या सीजनमध्ये सिद्धार्थ बिग बॉस 13 चा विजेता होता. त्याचवेळी गौहर ही बिग बॉस 7 ची विजेती होती. हिना खान बिग बॉस सीझन 11 ची रनरअप होती आणि मोनालिसा बिग बॉस 10 ची स्पर्धक होती.

आता हे चार स्पर्धक पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. चौघे घरात पाहुणे म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून जातील. परंतु ते कुठल्याही स्पर्धकाचे समर्थन करणार नाहीत. किंवा त्यांच्यासाठी कोणत्याही वोटिंग लाईन्स खुल्या राहणार नाहीत, परंतु ते प्रत्येक टास्क खेळतील. दरम्यान, एजाज खान, नैना सिंह, निशांत सिंग मलकाणी, जास्मीन भसीन, नेहा शर्मा आणि पवित्र पुनिया अशी नवे आहेत, ज्यांचे बिग बॉस 14 मध्ये असणे जवळजवळ निश्चित निश्चित मानले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like