अभिनेत्री कविता कौशिकचा धक्कादायक खुलासा ! म्हणाली- ‘लहानपणी शिक्षकानेच माझा…’

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. असं असलं तर ही सीजन गेल्या सीजनप्रमाणे धमाल करताना दिसत नाही. सीन पलटेगा अशी या शोची टॅगलाइन आहे. अलीकडेच घरात इम्युनिटी टास्क घेण्यात आलं होतं. यात स्पर्धकांनी असे अनुभव सांगितले जे अद्याप त्यांनी कुटुंबीयांना सांगितले नव्हते. हे सांगताना काहींना रडूही आलं होतं. दरम्यान अ‍ॅक्ट्रेस कविता कौशिक (Kavita Kaushik) हिनं धक्कादायक खुलासा करत आयुष्यातील काही सिक्रेट शेअर केले आहेत. लहानपणी शिक्षकांनीच माझा विनयभंग केला असा गौप्यस्फोट कवितानं केला आहे.

कविता म्हणाली, मी लहान असताना एका व्यक्तीनं माझा विनयभंग केला होता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझे ट्यूशनचे शिक्षक होते. या घटनेबद्दल मी माझ्या घरी सांगितलं होतं. परंतु कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, असंही ती म्हणाली.

कविता म्हणते, मी 11 वर्षांची होते. माझं गणित फार कच्चं होतं. यामुळं मला गणित शिकवण्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक केली. त्याचं वय जवळपास 65 वर्षांपेक्षा जास्त होतं. एकदा संध्याकाळी ते माझ्या घरी शिकवणीसाठी आले. त्यावेळी माझ्या आईवडिलांना बाहेर जायचं होतं. ते गेल्यानंतर या शिक्षकानं माझ्या सोबत अश्लील भाषेत बोलायला सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

कविता असंही म्हणाली की, काही नको ते घडण्याआधी मी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मी रडायला लागले आणि हा प्रकार माझ्या घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली. यावर ते म्हणाले, सांग. तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असं म्हणून ते निघून गेले. त्यानंतर मी आईला सर्व प्रकार सांगितला. परंतु तिनं विश्वास ठेवला नाही. तिला वाटलं की, मला गणित शिकायचं नाही म्हणून मी हे सगळं करत आहे.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच तिची डू नॉट ड्रीम ही शॉर्ट फिल्म रिलीज आहे. अभिनव शुक्ला डायरेक्टेड या सिनेमाचं एडिटिंगपासून तर प्रॉडक्शनपर्यंतचं सर्व काम कविताचा पती रोनित बिस्वास यानं सांभाळलं आहे. ही एक 13 मिनिटांची हॉरर फिल्म आहे. कविता घरीच याची शूटिंग केली आहे. एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिनं टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. एफआयआर या मालिकेव्यतिरिक्त कवितानं कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे. अलीकडेच ती बिग बॉस 14 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत आली होती.

You might also like