Bigg Boss : कवितानं केला खुलासा – शिक्षकानं केलं होतं ‘अश्लील’ कृत्य, आईनं विश्वास केला नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कविता कौशिक बिग बॉस 14 मध्ये तिच्या एंट्रीपासूनच खूप मजबूत दिसत होती. ती सर्वांचा सामना करते, सर्वांना टक्कर देते. पण सोमवारच्या एपिसोडमध्ये तिची भावनिक बाजू देखील पहायला मिळाली. कविता कौशिकने आपल्या एका अशा रहस्यविषयी सांगितले ज्याने तिला बालपणात खूप अस्वस्थ केले होते. बिग बॉसने इम्यूनिटी स्टोन मिळविण्यासाठी एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये सर्व स्पर्धकांना त्यांचे डार्क सिक्रेट सांगायचे होते.

कविता कौशिक म्हणाली, ‘मी 11 वर्षांची होती आणि माझे गणित खूप कच्चे होते, माझ्यासाठी एक ट्यूशन टीचर नेमण्यात आले. त्यांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक होते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा ते शिकवणीला आले तेव्हा आई-वडिलांना काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. आई-वडील गेल्यानंतर टीचर माझ्याशी फक्त अश्लील बोलले नाही तर माझे शोषण करण्याचे खूप प्रयत्नही त्यांनी केले.’

कविता म्हणाली, ‘काही वाईट घडले असते त्याआधीच मी आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि रडू लागले, आणि मी त्यांना धमकी दिली की मी हे सर्व माझ्या आई-वडिलांना सांगेन. यावर त्यांनी मला सांगितले की कोणीही तुझं ऐकणार नाही. तुझी आई माझ्यावर खूप विश्वास ठेवते आणि हे बोलून ते निघून गेले. त्यानंतर जेव्हा आईवडील आले तेव्हा मी आईला सांगितले. तर त्यांना वाटलं की मला गणित शिकायचं नाही, म्हणूनच मी असं सांगत आहे.’

‘त्यांनी पूर्णपणे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर मी कधीही गणित शिकले नाही. कारण मला प्रत्येक प्रश्नात त्या वृद्ध व्यक्तीचा चेहरा दिसत होता. मी प्रत्येक वृद्ध व्यक्तीचा तिरस्कार करत होते. यामुळे मी खूप तुटले. परंतु नंतर मी स्वत:ला सावरले आणि मजबूत केले.

You might also like