BIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं कन्फर्म, समोर आला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बिग बॉसचा 14वा सीझन 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शो बाबत जबरदस्त हाईप आहे. कन्टेस्टंटची लिस्टसुद्धा आता हळुहळु समोर येऊ लागली आहे. कलर्स चॅनलसुद्धा कन्टेस्टंटची झलक शेयर करत आहे. मागील दिवसात राधे मां शोमध्ये येण्यावरून मोठी चर्चा सुरू होती. राधे मां सोबत शोसाठी अ‍ॅप्रोच करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

नव्या रिपोर्टनुसार, राधे मांच्या फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. राधे मां बिग बॉस 14 मध्ये कन्टेस्टंट म्हणून दिसणार आहे. सोशल मीडियावर सुद्धा राधे मां च्या नावाचा ट्रेंड करत आहे.

राधे मां बाबत एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे. ज्यामध्ये तिची झलक दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे, हे घर कायम राहील. राधे मांच्या फॅन्ससाठी ही एक्सायटिंग बातमी आहे. फॅन्स तिला शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

राधे मां चे खरे नाव सुखविंदर कौर आहे. ती पंजाबशी संबधीत आहे. राधे मां ने कमी वयात अध्यात्मात पाऊल टाकले. राधे मां दानसुद्धा करते. राधे मां Shri Radhe Guru Maa Charitable Trust सुद्धा चालवते.

शो च्या कन्टेस्टंटच्या फायनल लिस्टचा सुद्धा खुलासा झाला आहे. शोमध्ये रूबीना दिलैक, अभिनव शुक्ला, शारदुल पंडित, शहजाद देओल, जस्मिन भसीन, निशांत मलकानी, पवित्रा पुनिया, ऐजाज खान, सारा गुरपाल, निक्की ताम्बोली, जान कुमार सानू आणि प्रतीक शोमध्ये दिसणार आहेत.

कोरोनामुळे यावेळी शोच्या फॉर्मेटमध्ये खुप बदल दिसणार आहेत. यावेळी शो मध्ये कन्टेस्टंटना लग्झरियस वस्तू सुद्धा मिळतील. शोमध्ये यावेळी मॉल, रेस्टॉरंट, स्पा आणि थिएटरसारख्या सुविधा असतील.

शो मध्ये एन्ट्रीपूर्वी सर्व कन्टेस्टंटची कोरोना टेस्ट करण्यात येईल. यानंतर प्रत्येक आठवड्याला त्यांची टेस्ट होईल. शोच्या प्रीमियरची शूटिंगसुद्धा जवळपास झाली आहे.

शो 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. सलमान खानच नेहमीप्रमाणे शो होस्ट करणार आहे. सलमान खान आठवड्यातून दोन दिसेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like