…म्हणून Bigg Boss सोडण्याच्या तयारीत होता ‘भाईजान’ सलमान ! कारण वाचून हैराण व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही वरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस 14 येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बिग बॉसच्या जवळपास सर्वच सीजनचं सूत्रसंचालन सलमान खान करत असतो. परंतु एक वेळ अशी आली होती जेव्हा सलमान खानला बिग बॉस सोडायचं होतं.

एका इंग्रजी वृत्तानुसार, सलमान खाननं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, त्याला बिग बॉस सोडायचं होतं. एकवेळ अशी होती की, सलमान खानला खूप ट्रोल केलं जायचं. असं म्हटलं जात होतं की, सलमान खान शोदरम्यान स्पर्धकांच्या आयुष्यात खूप हस्तक्षेप करतो. याच कारणामुळं तो ट्रोलर्सची शिकार होता. ट्रोलर्सला हैराण होऊन सलमानला हा शो सोडायचा होता. पंरतु असं असलं तरी ट्रोलर्सपेक्षा चाहत्यांकडून मिळणारं प्रेम हे कितीतरी जास्त आहे म्हणून मी हा शो सोडू शकलो नाही असं सलमान खान म्हणाला होता.

सलमानला बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी मिळणारं मानधन हे देखील नेहमी चर्चेचा विषय असतं. मीडिया रिपोर्टनुसार सलमानला एका एपिसोडसाठी 20 कोटी देण्यात येणार आहेत. पूर्ण सीझनसाठी त्याला 450 एवढं मानधन मिळणार आहे.

हे लोक असू शकतात बिग बॉसच्या घरात

रूबीना दिलैक, अभिनव शुक्ला, जास्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, शार्दुल पंडित, शहजाद पोल, पवित्रा पुनिया, नैना सिंग, प्रतिक सहजल स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेऊ शकतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like