Bigg Boss फेम अभिनेत्याची कामासाठी ‘भाईजान’ला साद ! म्हणाला- ‘माझ्याकडे सलमानचा नंबर नाही, मला काम द्या’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    आरजे आणि अ‍ॅक्टर शार्दूल पंडित (Shardul Pandit) याचा बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये खूप लहान प्रवास पाहायला मिळाला होता. ज्या वेगानं तो शोमध्ये आला होता, त्यापेक्षा जास्त वेगानं तो शोमधून बाहेर झाला होता. स्पर्धक म्हणून तो लोकांना जास्त आवडला नाही.

बिग बॉसमध्ये येण्याआधी त्याचं करिअर काही खास चाललं नव्हतं. लॉकडाउनमध्येही त्याची आर्थिक स्थिती खराब झाली होती.

एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, पैशांसाठीच तो बिग बॉसमध्ये आला होता. शोमध्ये येण्याआधी त्याच्याकडे काहीच काम नव्हतं. त्याला बिग बॉसकडून खूप अपेक्षा होत्या. त्याला वाटलं होतं की, तो लाईमलाईटमध्ये येईल आणि त्याला काम मिळायला सुरुवात होईल.

परंतु त्याची निराशा झाली. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर शार्दूलनं सर्वांत आधी सलमान खान (Salman Khan) कडे काम मागितलं होतं. तो म्हणाला होता की, माझ्याकडे काहीच काम नाही. माझ्याकडे सलमान खानचा नंबर नाही. परंतु मला त्यांना असा संदेश द्यायचा आहे की, जर एखाद्या अ‍ॅक्टरची जागा खाली असेल किंवा माझ्यासाठी काही काम असेल तर नक्की द्या.

शार्दूलची परिस्थिती सलमानसहित घरातील सर्व सदस्यांना माहीत आहे. आता चाहत्यांना आशा आहे की, सलमान शार्दूलची मदत नक्की करेल. सलमान खाननं आजवर अनेकांना काम दिलं आहे आणि मोठंही केलं आहे. आता शार्दूललाही त्याच्याकडून खूप आशा आहेत.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख पठाण सिनेमातही दिसणार आहे.

 

You might also like