Bigg Boss 14 मध्ये दमदार सिनियर्सच्या एन्ट्रीवर माजी विजेती शिल्पा शिंदेने उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांना बिग बॉस 14 मध्ये स्ट्रॉंग सिनियर्स म्हणून पाहिले गेले होते. आता शिल्पा शिंदेने त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तिने विचारले की, नवीन सीजनमध्ये मागील सिजनमधील स्पर्धक काय करीत होते? दरम्यान, ,बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे हिच्याबद्दल बातमी आली होती की, ती सध्याच्या सीजनमध्ये सिनियर म्ह्णून दिसणार आहे. मात्र, नंतर तिने हे नाकारले. आता तिने निर्मात्यांना विचारले की, बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये पूर्वीच्या स्पर्धकांना का बोलावले गेले होते आणि त्यांची उपयुक्तता काय होती. दरम्यान, शिल्पा शिंदे बिग बॉसच्या निर्मात्यांशी आपल्या मतभेदांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा तिने म्हंटले की, ती या शोपासून पुढे सरकली आहे.

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, शिल्पा म्हणाली, ‘मी बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये जात नाही आहे. मी याच्या पुढे गेली आहे. सध्या मी दुसऱ्या कामात व्यस्त आहे, जे यापेक्षा मोठे आहे. मी काहीतरी नवीन करण्यावर विश्वास ठेवते. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्यात आनंद येत नाही. माझ्या प्रेक्षकांनी प्रत्येक वेळी मला एका नवीन अवतारात पाहिले आहे. यावेळी देखील त्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल. ‘

शिल्पा शिंदेने विचारले की, ‘बिग बॉसच्या घरात आधीचे स्पर्धक काय करतात हे मला समजत नाही? मला हे जाणून घ्यायचे आहे की, सध्याच्या स्पर्धकांसोबत हा भेदभाव नाही का? दरम्यान, बिग बॉसच्या इतिहासात प्रथमच घडले आहे की, तीन माजी स्पर्धकांना दमदार सिनियर म्हणून 15 दिवस नवीन स्पर्धकांसोबत राहण्याची संधी देण्यात आली. यावेळी बिग बॉस पहिल्यापेक्षा खूप वेगळा आहे. बिग बॉसमध्ये रुबीना दिलेक आणि अभिनव शुक्ला खूप चांगले काम करत आहेत.

You might also like