Bigg Boss 14 च्या सेटवरून समोर आली वाईट बातमी ! टॅलेंट मॅनेजरचं अपघातात निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या सेटवरून एक वाईट बातमी समोर आली आहे. शोच्या सेटबाहेर 2 टीम मेंबरचा भीषण अपघात झाला आहे. शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड (Pista Dhakad) हिचा या अपघातात मृत्यू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, तिला खूप जास्त इजा झाली होती. जास्त रक्त वाहिल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

ॲक्सिडेंटमध्ये झाला पिस्ताचा मृत्यू
शुक्रवारी बिग बॉस 14 च्या टीमनं सलमान खान सोबत वीकेंड वॉर शुट केलं होतं. पॅकअपनंतर पिस्ता तिच्या स्कुटीवरून गेली होती. रस्त्यावरील अंधारामुळं तिचा स्कुटीवरील कंट्रोल सुटला आणि स्कुटी घसरून एका खड्ड्यात गेली. यावेळी पिस्ता सोबत एक सहकारी होता. दोघंही जोरात आपडले.

असा झाला अपघात
जेव्हा पिस्ता पडली तेव्हा मागून एक व्हॅनिटी व्हॅन येत होती जी तिच्या अंगावरून गेली. 24 वर्षीय पिस्ताचा जागीच मृ्त्यू झाला.

पिस्तानं बिग बॉस व्यतिरीक्त खतरों के खिलाडी मध्येही काम केलं आहे. अनेक स्टार्स सोबत तिचे चांगले संबंध होते. पिस्ताच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु शोचे मेकर्स किंवा सलमान खान यांच्याकडून अद्याप कोणतंही स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाही.