Bigg Boss 15 | बिग बॉस 15 मध्ये रश्मि देसाईसोबत राखी सावंतनं केलं जोरदार भांडण, रश्मि म्हणाली – शमिता होणार बिग बॉस 15ची विजेती…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Bigg Boss 15 | छोट्या पडद्यावर बिग बॉस 15 (Bigg Boss 15) नं प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. बिग बॉस 15 चे चाहते या कार्यक्रमाच्या गैंड फिनालेसाठी प्रचंड प्रमाणात आतुर झाले आहेत. बिग बॉस 15 मध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चाहते शोमध्ये खेळून राहण्यासाठी अनेक कलाकारांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. यामध्ये राखी सावंतचा (Rakhi Sawant) सुद्धा समावेस होता.

 

बिग बॉस 15च्या कार्यक्रमामध्ये चारचांद लावण्यासाठी आरजेला बोलावण्यात आलं होतं. ज्यामध्ये आरजेनं स्पर्धकांना अनेक हटके प्रश्न विचारले. यादरम्यान राखी सावंत (Rakhi Sawant) आणि रश्मि देसाई (Rashami Desai) यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचं बघायला मिळालं. नक्की या एपिसोड मध्ये या दोघांच्या वाद होण्यामागचं कारण काय होतं ते बघू.

 

अलीकडेच बिग बॉस (Bigg Boss 15) मध्ये आरजेला बोलावण्यात आलं होतं. सर्वप्रथम त्याने निशांतला (Nishant Bhat) प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानं निशांतला घरातील सगळ्या स्पर्धक सदस्यांसाठी गाणं डेडिकेट करायला सांगितलं. तसेच त्यांच्यासोबत डान्सदेखील करायला सांगितला. याच दरम्यान निशांतनं मर्सी हे गाणं शमिताला (Shamita Shetty) डेडीकेट करून, तिच्यासोबत डान्स केला. त्याचबरोबर त्यानं अनेक प्रश्नांना सविस्तरपणे उत्तरं दिलं.

 

तेजस्वीला (Tejasswi Prakash) यामध्ये विचारण्यात आले की, तु विक्टिम कार्ड खेळतेस का? यावर तेजस्वीनं सांगितलं कि, ‘ती विक्टीम कार्ड खेळत नाही. तसेच या शोमध्ये ती एकटीच अशी स्पर्धक आहे, जी अनेकदा व्हीआयपी मध्ये प्रवेश करून बाहेर झाली आहे.’

दरम्यान, रश्मिला (Rashami Desai) घरातील सगळ्या स्पर्धकांच्या पर्सनॅलिटी नुसार त्यांना चिन्ह द्यायला सांगितलं.
त्याच वेळी रश्मिनं करण (Karan Kundrra) आणि तेजस्वीला (Tejasswi Prakash) तराजू दिलं.
निशांतला (Nishant Bhat) पेंडुलम, प्रतिकला (Pratik Sehajpal) लाऊड स्पीकर, शमिताला (Shamita Shetty) कॅट तर राखीला रश्मिनं थाल दिली.
तसेच रश्मिला बिग बॉस 15 सीझनमध्ये विजेता कोण होऊ शकत? असं विचारलं असता रश्मि म्हणाली, “इमानदारीमध्ये सांगू इच्छिते शमिता शेट्टी हा शो जिंकू शकते.
तसेच बायस्ड बनून सांगायला गेलं तर, राखी सावंत (Rakhi Sawant) हा खेळ जिंकू शकते. कारण ती तेच डिजर्व करते.”

 

या सगळ्या प्रश्न-उत्तरांच्या दरम्यान प्रतीकनं एक जुनी गोष्ट सांगितली. त्यामध्ये रश्मिनं राखीला चीप म्हंटलं होतं.
त्यामुळे राखी रश्मिवर चिडते आणि चांगलीच बडबड करते.
तसेच शोमध्ये राखी चांगलीच रडते, मात्र नंतर शमिता (Shamita Shetty) त्यादोघींची समजूत काढते.

 

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 25 january 2022 written updates rakhi sawant and rashami desai gets into an ugly fight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Republic Day 2022 | धनकवडीच्या ऐश्वर्य कट्ट्याने पुढाकार घेत त्यांच्या जीवनात अनपेक्षित अशी आठवण पेरली ! स्वच्छतादूतांनी केले ध्वजारोहण

 

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4 गोष्टी; जाणून घ्या

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी