Bigg Boss 15 | व्हिआयपी रितेशचे पत्नी राखी सावंतसोबत झाले भांडण, म्हणाला – ‘तुझ्यापेक्षा शंभर टक्के…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 मध्ये सध्या मोठ्या ट्वीस्ट आला आहे. शोची टीआरपी वाढवण्यासाठी शोमध्ये मागील सीझन्समधील काही खेळाडूंची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली आहे. हे व्हिआयपी खेळाडू नाॅन व्हिआयपी खेळाडूंवर वारंवार निशाणा साधत त्यांना सुनावत आहे. यादरम्यान व्हिआयपी रितेशने देखील तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्राच्या (Karan Kundra) नात्यावर प्रश्न उपस्थित केले. (Bigg Boss 15)

 

बिग बॉस 15

 

रितेशने केलेल्या आरोपांमुळे करण कुंद्रा आणि रितेशमध्ये जोरदार वाद पेटला. यावरुन राखी तिच्या पतीला समजवण्यासाठी गेली असता पती-पत्नी वाद पेटला. आपला पती इतक्या लवकर दुश्मनी काढेल असं राखीला वाटलं नव्हतं. यावरुन राखीने मी तुला सगळ्यांसोबत वैर काढू नको असं सांगितलं होत ना, असं रितेशला म्हणताच रितेशने मी तुझ्यापेक्षा शंभर टक्क्यांनी (100%) पुढे आहे, त्यामुळे तु शांत रहा, असं राखीला सुनावलं. (Bigg Boss 15)

 

बिग बॉस 15

 

भडकलेल्या रितेशला समजवण्यासाठी राखी सावंतने (Rakhi Sawant) बरेच प्रयत्न करत कधी-कधी मी सांगितलेलं ऐकत जा असं सांगितलं.
यावर मला समजलं, असं रितेशने उत्तर दिलं. रितेशने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
त्यावररणने प्रत्युत्तर देत राखी सावंतसोबत लग्न करुन रितेश पळून गेला, असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 rakhi sawant and her husband ritesh argument for game plan he shares his strategy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध

Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा

Benefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, माहित नाहीत तर जाणून घ्या!

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)