Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 हा सिझन सर्वात जास्त बोरिंग (Boring) असल्याचं प्रक्षेकांचं म्हणं आहे. एवढंच नाही तर या सिझनमुळे बिग बाॅसची टीआरपी (TRP) देखील कमी झाली होती. टीआरपी वाढवण्यासाठी मागील सिझन्समधील 3 अभिनेत्रींची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली. यामध्ये रश्मी देसाई (Rashmi Desai), राखी सावतं (Rakhi Sawant) आणि देवोलिन भट्टाचार्यजी (Devoleena Bhattacharjee) यांचा समावेश आहे. या तिघींच्या एन्ट्रीने बिग बाॅस 15 मध्ये ट्वीस्ट आणलं आहे. (Bigg Boss 15)

 

तिन वाईल्ड कार्ड एन्ट्रीसोबत बिग बाॅसच्या घरात आणखीन एक खास एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे राखीचा पती रितेशची (Ritesh). दोन वर्षांपुर्वी राखीचं लग्न झालं होतं. मात्र तिचा पति कोणाच्या समोर न आल्याने सर्वांनाच त्याला पाहण्याची उत्सुक्ता होती. अशातच त्याने बिग बाॅसमध्ये एन्ट्री केली असल्याने बिग बाॅसची टीआरपी वाढली आहे. रितेशच्या एन्ट्रीच्या वेळेस तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्राने (Karan Kundra) रितेशचं जोरदार स्वागत केलं होतं. मात्र अशातच रितेशने तेजस्वी आणि करणच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश

 

बिग बाॅसचा आठवा अठवडा संपणार असताना ‘विकेंड का वार’ (Weekend Ka War) मध्ये पुन्हा एकदा सलमान खान (Salman Khan) समोर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. वाईल्ड कार्ड एन्ट्री सदस्यांनी वारंवार नाॅन विआयपी सदस्यांवर निशाणा साधला आहे. अशातच रितेशने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा दोघेही खोटे (Fake) असल्याचं म्हटलं आहे. यासोबत तेजस्वी आणि करणमध्ये प्रेम (Love) असतं तर ते त्यांच्याबाबत देखील बोलले असते, मात्र दोघं नेहमीच खेळाबाबत (Game) बोलत असतात, असं रितेशने म्हटलं आहे. एवढंच नाही तर रात्री देखील दोघं खेळाबाबतच बोलत असतात, असं रितेशने म्हटलं आहे. (Bigg Boss 15)

तेजस्वी प्रकाशने राखी सावंत समोर तिच्या मनातील करण बाबतच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
तरी देखील राखीने तेजस्वीला घरातली सर्वात बोरिंग खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.
तसेच रितेशने केलेल्या आरोपांवर सलमानने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी तुम्ही देखील राखीला लग्नाच्या तिन वर्षानंतर भेटला, त्यामुळे कोणालाही जज (Judge) करता येत नसल्याचं यावेळी सलमानने म्हटलं आहे.

 

बिग बॉस 15

 

तेजस्वी आणि रितेशच्या नात्यावर रितेशने दिलेल्या प्रतिक्रीयाने तेजस्वी आणि करण दोघेही नाराज झाले आहेत.
तर तेजस्वीने यावेळी मला खूप वाईट वाटतं की तुम्ही आम्हाला जज करत आहात, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

 

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 rakhi sawant husband ritesh called tejasswi prakash and karan kundrra relationship fake says they only talk about games

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

TV खरेदीसाठी जाताय का? ‘या’ 5 गोष्टी आवश्य पाहून घ्या, अन्यथा नंतर वाढू शकते चिंता!

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ