Bigg Boss 15 | ‘तेजस्वी’च्या आईला नाही आवडत करण कुंद्रा आणि तेजस्वीची जवळीक; रश्मी देसाईनं केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Bigg Boss 15 | बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये नवीन व्हीआयपी (VIP) सदस्यांनी प्रवेश केला आहे. एकीकडे जिथे घरातले आतापर्यंत प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले नाहीत, तर दुसरीकडे निर्माते शोची टीआरपी वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. या आठवड्यात घरात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आले आहेत. रश्मी देसाई (Rashmi Desai), राखी सावंत (Rakhi Sawant) आणि देवोलीना भट्टाचार्यने (Devoleina Bhattacharya) नवीन व्हीआयपी सदस्य म्हणून घरात प्रवेश केला आहे. तर तेजस्वी तिची खास मैत्रीण रश्मी देसाईसोबत तिच्या आणि करणच्या नात्याबद्दल बोलताना दिसली.

 

रश्मी देसाई यांनी घरात येताच सदस्यांच्या खेळावर आपली मतं मांडली. रश्मीने उमरच्या (Umar) खेळाचे कौतुक केले.
तर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांना प्रेमावर तसेच बिग बॉसच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं.
रश्मी आणि तेजस्वी आधीपासून चांगल्या मैत्रिणी आहेत.
तसेच बिग बाॅस 15च्या (Bigg Boss 15) घरात येण्यापूर्वी तेजस्वीच्या आईशी (Mother) बोलणं झाल्याचे रश्मीने सांगितले.

 

जेव्हा तेजस्वीच्या आईला तेजस्वीला (Tejasswi Prakash) बिग बॉसच्या घरात पाहून कसं वाटलं, असं विचारलं.
याबाबत रश्मी म्हणाली की तिला तुझा गेम (Game) खूप आवडला पण करण सोबत जे काय आहे त्याबद्दल फारसा आनंद नसल्याचं आईने सांगितलं.
तसेच तुमच्या दोघांची जोडी मला आवडत असली तरी ती त्या पालक आहेत म्हणून काळजी करतात. हे ऐकून तेजस्वी थोडी काळजीत पडली.

रश्मी देसाई करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश या दोघांच्या खूप जवळची आहे.
अशा परिस्थितीत जेव्हा करण कुंद्राने रश्मी देसाईला तिच्या खेळा बद्दल विचारले त्यावर ती म्हणाली तेजस्वी तुला वारंवार गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.
मात्र तू उलट सर्व काही बिघडवत असतो. तिला खेळ समजत असतो पण तु त्याला वारंवार खराब करत आहेस.

 

Web Title : Bigg Boss 15 | bigg boss 15 rashami desai revealed that tejasswi prakash mother is not happy with her relationship with karan kundrra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Alia Bhatt | अबब…! ‘RRR’ चित्रपटामध्ये फक्त 15 मिनिटं काम करण्य़ासाठी आलियानं घेतले इतके ‘कोटी’ !

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 2022 मध्ये वेतनात होणार भरघोस वाढ?, जाणून घ्या

Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव