Bigg Boss 16 | प्रेक्षकांसमोर डान्स करताना ‘शालीन – अर्चना ‘चा तोल गेला अन्…

पोलीसनामा ऑनलाईन : ‘बिग बॉस’ हिंदीचं 16 वं (Bigg Boss 16) पर्व सध्या ग्रँड फिनालेच्या दिशेने जात आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सध्या सलमान खानच्या जागी करण जोहर या शोचं सुत्रसंचालन करत आहे. हा या शोचा शेवटचा आठवडा आहे. सुंबूल तौकिर खान घरातून बाहेर पडल्यानंतर घरात सध्या अर्चना गौतम, शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, निमृत कौर अहलूवालिया, एमसी स्टॅन, शालीन भानोत हे सहा सदस्य आहेत. (Bigg Boss 16)
‘बिग बॉस’च्या या शेवटच्या आठवड्यामध्ये घरातील एका सदस्याला घराबाहेर जावं लागणर आहे. पण, यावेळी वोटिंगच्या आधारे नाही तर घरात आलेले प्रेक्षक फिनालेमधील टॉप 5 सदस्य निवडणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात फिनालेपूर्वी पुन्हा एकदा जनता घरात येईल आणि आपल्या आवडत्या स्पर्धकाला मतदान करेल आणि त्याला सुरक्षित करेल. (Bigg Boss 16)
#BiggBoss16 Promo Mid Week Eviction
Ghar mai aaye Fans Ne Kiya Contestant Ko Eviction #BB16 #BiggBoss #MCStan#ShivThakare #ShalinBhanot#ArchanaGautam #NimritKaurAhluwalia#PriyankaChaharChoudhary pic.twitter.com/yTNQE788rG— suroor hussain (@suroorhussain72) February 5, 2023
‘बिग बॉस 16’ शोचा नवा प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये घरात आलेल्या प्रेक्षकांसमोर प्रत्येक स्पर्धक स्टेजवर येऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा
आणि त्या प्रेक्षकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
शिव ठाकरे स्टेजवर येऊन आपल्याला फक्त प्रेक्षकांच्या प्रेमाची गरज आहे, कारण त्यांच्यामुळेच मी इथे आहे असं
सांगतो. त्यानंतर अर्चना मी सुरुवातीपासून एकटीच खेळत असल्याचे सांगते.
तर प्रियंका म्हणते की, घरात येण्यापूर्वी मी विचार केला होता की मी जे करेन ते मनापासून करेन.
बाकी सर्व देवाच्या आणि प्रेक्षकांच्या हातात आहे.
सर्वांचं बोलून झाल्यावर सर्व स्पर्धक प्रेक्षकांना खूश करण्यासाठी डान्स देखील करतात.
यावेळी शालीन भानोत आणि अर्चना गौतम यांनी कपल डान्स केला.
पण नाचता नाचता दोघांचाही तोल जातो आणि दोघेही स्टेजवर पडतात.
दोघांनाही खाली पडताना पाहून स्पर्धक व घरातील प्रेक्षकांमध्ये एकच हशा उडतो.
Web Title :- Bigg Boss 16 | bigg boss 16 shalin bhanot archana gautam fallen down while dancing in front of audience video viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी