Bigg Boss 16 | सुम्बुल तौकीर खानच्या वडिलांनी तिला दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या नक्की काय म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सध्या चांगलाच रंगला आहे. शिव (Shiv Thakare) आणि अर्चनाच्या (Archana) वादानंतर आता बिग बॉस मध्ये टीना दत्ता (Tina Datta), शालिन भानोत (Shalin Bhanot) व सुम्बुल तौकीर (Sumbul Touqeer) यांची चर्चा सध्या सुरू आहे. सलमानने (Salman Khan) याआधीच सुम्बुलला शालिनच्या अधिक जवळ जात असल्याचे म्हटले होते (Salman Khan Says She Obsessed With Shalin Bhanot). सलमानच्या या वक्तव्यानंतर काहींनी त्याला चुकीचे असल्याचे ठरवले आहे तर काहीनी त्याचे मत बरोबर असल्याचे म्हटले आहे. तर आता याच दरम्यान सुम्बुलच्या वडिलांनी एक धक्कादायक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

 

इंस्टाग्राम अकाउंट द्वारे कलर्स वाहिनीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुम्बुल (Sumbul Touqeer) ही बिग बॉसच्या घरातील कनेक्शन रूम मध्ये बसलेली दिसत आहे. तर बिग बॉस फोन द्वारे तिच्या वडिलांशी तिचे बोलणे करून देताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

 

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की सुम्बुलचे वडील तिला विचारतात, “सुम्बुल हे काय सुरू आहे?”.
यावर त्यांना उत्तर देत सुम्बुल (Sumbul Touqeer) म्हणते,
“मी खरंच सांगते जे काही होत आहे ते असं का घडतंय मला काहीच कळत नाही”.
तर यावर तिचे वडील तिला म्हणतात, “टीनाला जाऊन बोल तुला लाज वाटली नाही का? आता शालीन व टीनाला नॅशनल टीव्हीवर त्यांची लायकी दाखव” असे सुम्बुलचे वडील सुम्बुलला म्हणतात.
तर यावर सुम्बुल (Sumbul Touqeer) बोलते, “तुम्ही जसे सांगितलं आहे ना तसंच मी करणार”.
सध्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेक्षक मात्र सुम्बुलच्या वडिलांनी चुकीचा सल्ला दिला आहे असे बोलत आहेत.
तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे.

 

Web Title :- Bigg Boss 16 | bigg boss 16 sumbul touqeer father hasan khan support her daughter after salman khan says she obsessed with shalin bhanot watch video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

Pune Crime | सावत्र बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; नराधम बापाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात FIR