Bigg Boss 16 | ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री

पोलीसनामा ऑनलाईन : Bigg Boss 16 | सध्या ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) आणि ‘बिग बॉस हिंदी’ (Bigg Boss Hindi ) हे दोन्ही कार्यक्रम चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. रोज अनेक वाद आणि भांडण या घरामध्ये पाहायला मिळतात. तर कधी स्पर्धकांच्या वक्तव्यामुळे नेहमीच ते चर्चेत असतात. आता मराठी बिग बॉस प्रमाणे हिंदीमध्ये देखील वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) पाहायला मिळणार आहे. मराठी बिग बॉस मध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) हिने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. तर आता हिंदी मध्ये कोणती अभिनेत्री वाईल्ड कार्ड एंट्री घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. (Bigg Boss 16)

बिग बॉस 16 मध्ये मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तसेच बिग बॉस ओटीटी मध्ये देखील सहभागी झालेली अभिनेत्री म्हणजेच रिधिमा पंडित (Ridhima Pandit) एन्ट्री घेऊन हिंदी बिग बॉस मध्ये दिसणार आहे. काही दिवसाआधी शिव (Shiv) आणि अर्चना (Archna) चे भांडण गाजले होते. यानंतर आता या वाईल्ड कार्ड एंट्री मुळे घरात पुन्हा नवीन काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Bigg Boss 16)

काही दिवसांपूर्वीच शोमध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि एमसी स्टॅन (Mc Stan) वाईल्ड कार्ड स्पर्धकाबद्दल बोलत होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता रिधिमाची एन्ट्री बिग बॉस मध्ये पाहायला मिळणार. मात्र अद्याप तरी रिधिमा विकेंडच्या वार मध्ये दिसणार की अचानक सर्व स्पर्धकांना सरप्राईज देईल हे मात्र उघड झाले नाही.

रिधिमाने याआधी ‘बहू हमारी रजनीकांत’ (Bahu Hamari Rajnikant), ‘यो की हुआ ब्रो’ (Yo Ke Hua Bro),
‘आय एम बिकॉज ऑफ अस’ (I Am Because of Us), ‘हैवान द मॉनस्टर’ (Haiwan The Monster)
या मालिकांमध्ये काम केले होते. तर बिग बॉस ओटीटीमध्ये देखील सहभागी झाली होती मात्र ती लवकरच त्यातून बाहेर देखील पडली होती.

Web Title :-  Bigg Boss 16 | ridhima pandit to enter at bigg boss show as wild card contestant marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | मटणाच्या सुपात भात आल्याने खानावळीतील वेटरचा खून; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Disha Patani | दिशा पटानीने टू-पीस बिकिनी घालून दिली बोल्ड पोज, फोटो पाहून कमेंट्सचा पडला पाऊस

Maharashtra Police | धक्कादायक ! ‘चरस’च्या तस्करी प्रकरणी 2 पोलिस कर्मचारी गोत्यात