Bigg Boss 16 | फिनालेपूर्वी अभिनेत्री टीना दत्ता झाली बेघर; चाहत्यांना बसला मोठा धक्का

0
142
Bigg Boss 16 | television tina duttas fake love story fails actress becomes homeless before finale
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ (Bigg Boss 16). सध्या बिग बॉसचा सीजन १६ वा प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेत आहे. प्रेक्षकही उत्सुकतेने बिग बॉस पाहतात. बिग बॉसकडून (Bigg Boss 16) देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीच कमी राहत नाही. आता नुकतीच या शोमधून टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता बाहेर पडली आहे. त्यामुळे हा शो आणखीनच रंजक वळणावर येऊन थांबला आहे.

बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय सदस्यांपैकी टीना ही देखील एक लोकप्रिय स्पर्धक होती. टीना शोमधून बाहेर पडताच चाहते नाराज झाल्याचे दिसत आहेत. टीनाच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. सुरुवातीच्या काळात टीनाने घरात राहत अनेक वादविवाद निर्माण केले होते. त्याचबरोबर टीनाने आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. एवढेच नाही तर टीना शालिनसोबतच्या तिच्या ऑन आणि ऑफ रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. अनेकदा या दोघांनी मिळून अनेक स्पर्धकांना टार्गेट केल्याचे देखील दिसून आले होते. घरात प्रत्येक भांडणाची सुरुवात या दोघांकडूनच होत होती. (Bigg Boss 16)

घरात कित्येकदा हे दोघे एकत्रित दिसत होते. तर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले देखील गेले होते. मात्र शोमध्ये न्यू इअर सेलिब्रेशन केल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात टीनाने शालीन ची बाजू सोडली होती. एवढेच नाही तर यानंतर टीना अभिनेत्री प्रियंका चहर चौधरीला आपली चांगली मैत्रीण बनवले होते. तर आता नवीन प्रोमो मध्ये दिसत आहे की फराह खानने टीना सोबतच प्रियांकालाही चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

Web Title :-  Bigg Boss 16 | television tina duttas fake love story fails actress becomes homeless before finale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tara Sutaria | तारा सुतारियाच्या लूकने वाढले सोशल मीडियाचे तापमान

Rashmika Mandanna | एअरपोर्टवर स्पॉट झाली रश्मिका मंदाना

Shivani Dandekar | ‘या’ कारणामुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!