‘हे’ सगळं Ex बायफ्रेन्ड अरहाननं केलं, सेक्स रॅकेटमध्ये पकडल्यानंतर अमृता धनोआनं सांगितलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसची स्पर्धक आणि अरहान खानची एक्स गर्लफ्रेंड अमृता धनोआला शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी गोरेगाव हॉटेलमधून अटक केले होते. मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून अमृताला पोलिस रेडमध्ये अटक करण्यात आली होती. अमृताशिवाय अभिनेत्री ऋचा सिंगलाही अटक करण्यात आले होते. आता अमृताने या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना तिचा एक्स प्रियकर अरहानवर आरोप केला आहे.

अमृता धनोआने अरहान खानवर फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. तसेच अरहानच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. अमृता म्हणाली की ‘मला या प्रकरणात फसविण्याचे षडयंत्र अरहानने रचले आहे.’

वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कांबळेंनी सांगितले की, ज्या दोन अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्या दोघी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होत्या. दोन्ही अभिनेत्रींवर सेक्शन 370 (3), आयपीसी 34 आणि सेक्शन 4,5 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना हॉटेलमधील या घटनेची माहिती मिळाली होती. याआधारे पोलिसांनी हा छापा टाकला.

पोलिसांनी ग्राहक बनून रॅकेट चालवणाऱ्यांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात येताच त्यांना अटक केली. अमृताला पोलिसांनी याच छाप्यात अटक केली. जेव्हा अमृताला छापा पडल्याचे लक्षात आल्यावर घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी योग्य वेळी तिला ताब्यात घेतले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/