Bigg Boss | ‘गोल्डमॅन’ने सांगितले एवढे दागिने घालण्यामागचे कारण; म्हणाला मी लहानपणापासूनच…

पोलीसनामा ऑनलाइन : Bigg Boss | सध्या बिग बॉस हिंदीचे 16 वे पर्व चांगलेच रंगताना दिसत आहे. या घरात शिवची धमाल असो की, अर्चनाची भांडणे सगळेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तर या घरात नुकत्याच पुण्याच्या दोन मराठमोळ्या सदस्यांनी एन्ट्री घेतली आहे. यांच्या येण्याने घरातील वातावरण बदलल्याचे दिसत आहे. गोल्डन बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे असे लोकप्रिय असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर यांनी बिग बॉस 16 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. त्यामुळे ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Bigg Boss)

हे गोल्डन बॉइज नेहमीच सोन्याने भरलेले दिसतात. सोन्याची चैन, अंगठ्या, ब्रेसलेट, सोन्याचे घड्याळ एवढेच काय तर सोन्याचे मोबाइल आणि आता कारलाही त्यांनी सोन्याचा मुलामा दिल्याचे समोर आले आहे. या सर्व गोष्टी चर्चेत असतानाच सनीने एका मुलाखतीत त्याला सोन्याची एवढी का आवड आहे, त्याबद्दल खुलासा केला आहे. (Bigg Boss)

एका मुलाखतीत सनीला एवढे सोने परिधान करणे तुमच्यासाठी अवघड नाही का,
असे विचारण्यात आल्यावर त्यांनी यावर अतिशय युक्तिवाद असे उत्तर दिले.
उत्तर देताना तो म्हणाला, “एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची सवय झाल्यानंतर ते त्याला काही अवघड
वाटत नाही. उदा. आपण जिममध्ये जात असतो जर एखादी व्यक्ती 100 किलो वजन उचलत असेल तर ते
पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. मात्र, त्या व्यक्तीने एकदमच एवढे वजन उचललेले नसते हळूहळू करत ती
इथपर्यंत येऊन थांबलेली असते. सांगण्याचा तात्पर्य म्हणजे मला लहानपणापासूनच सोने अंगावर परिधान
करण्याची सवय आहे. त्यामुळे मी सहज एवढे सोने अंगावर परिधान करू शकतो.
माझ्या अंगावर जवळपास सात ते आठ किलो सोने मी परिधान करू शकतो, तर बंटी म्हणजेच संजय गुजर हा
सहज चार ते पाच किलो सोने अंगावर झेलू शकतो. एवढे सोने घालणे आम्हाला कधीच अडचणीचे वाटले नाही”.
येणाऱ्या काळात आता ही जोडी घरात काय धमाल करेल हे लवकरच समोर येईल.

Web Title :- Bigg Boss | bigg boss pune goldman sunny waghchaure talk about why he is carry gold jewellery know the exact reason behind it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

Sidhu MooseWala Murder Case | सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात