‘तू आत्महत्या का नाही करत ?’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बॉस 11 ची स्पर्धक बेनफ्शा सूनावाला (Benafsha Soonawalla) सध्या चर्चेत आली आहे. बेनफ्शानं नुकतच चाहत्यांसोबत लाईव्ह चॅट केलं. यावेळी एकानं तिला असा काही प्रश्न विचारला की, तिचा पारा चढला आणि तिनं थेट त्या युजरविरोधात सायबर पोलिसात तक्रार केली. शिवाय तिनं त्या युजरला उत्तरही दिलं आहे.

काय होता प्रश्न ?

अलीकडेच बेनफ्शानं इंस्टावरून चाहत्यांसोबत लाईव्ह चॅट केलं. यावेळी एकानं तिला खूप चकित करणारा प्रश्न केला. युजरनं तिला विचारलं की, तू आत्महत्या का नाही करत ? यावर बेनफ्शा खूप संतापली.

काय म्हणाली बेनफ्शा ?

संतपालेल्या बेनफ्शानं प्रतिक्रिया देताना लिहिलं की, “जगभरातील लोक सध्या कोरोनामुळं त्रस्त आहेत. लोक मानसिक आजारांशी लढत आहेत. गरीब व्यक्ती बेरोजगार झाला आहे आणि तू हे काय विचारत आहेस ? असे प्रश्न विचारण्याआधी एकदा विचार करायला हवा.”

बेनफ्शाची पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. तिनं दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये तिनं सायबर पोलिसांनाही टॅग केलं आहे.

बेनफ्शाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती बिग बॉस 11 ची स्पर्धक आहे. एमटीव्ही इंडियावर व्हिडीओ जॉकीच्या रुपात तिनं करिअरची सुरुवात केली होती. बेनफ्शा 2016 मध्ये रोडीज X4 मध्येदेखील झळकली आहे. बेनफ्शा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे. तिनं अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत.