‘Bigg Boss’चे स्पर्धक बनून कोट्यावधी रूपये कमवतात ‘सेलिब्रेटी’, जाणून घ्या किती आहे ‘फीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिग बॉस हा एक टीव्ही शो आहे ज्यामध्ये काहीही घडू शकते. वादापासून ते मोठ्या लढाई आणि अचानक लव्ह स्टोरीपर्यंत या शोमध्ये काहीही शक्य आहे. बिग बॉसमध्ये अनेक सेलिब्रिटी येतात आणि लोकांना त्यांचे वेगवेगळे रंग बघायला मिळतात. बिग बॉस हा शो चाहत्यांमध्ये त्याच्यामधील वादविवाद आणि धक्कादायक गोष्टींसाठी ओळखला जातो.

दरम्यान, शोमधील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे स्पर्धकांना मिळालेल्या पैशांमधील फरक. काही स्पर्धकांना सामान्य किंमत दिली जाते, तर काहींना बिग बॉसवर मोठी रक्कम देण्यात आली आहे. शोमध्ये बिग बॉस विजेत्यांपेक्षाही जास्त पैसे मिळवणारे स्पर्धक होते. चला आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात

बिग बॉस ११ मध्ये हिना खान
बिग बॉस ११ च्या पहिल्या १० आठवड्यांसाठी हिना खानला १.२५ कोटी रुपये देण्यात आले होते, तर शिल्पा शिंदे यांना दर आठवड्याला ६ लाख रुपये दिले जात होते. अंतिमतः शिल्पा जिंकली तरीही तिला हिनापेक्षा कमी पैसे मिळाले. शिल्पाला १.२९ रुपये तर हिनाला १.७५ कोटी रुपये मिळाले.

बिग बॉस ९ मधील रिमी सेन
असा विचार केला जात आहे की बिग बॉसच्या घरात येऊन स्पर्धेत सामील होण्यासाठी रिमी सेनला २ कोटी रुपये दिले जात होते. ही रक्कम इतर स्पर्धकांपेक्षा जास्त होती.

बिग बॉस ४ मध्ये खली
जरी या हंगामात श्वेता तिवारीला मोठी रक्कम दिली जात होती, पण खलीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळखीमुळे त्याला तिच्यापेक्षा अनेकपट जास्त रक्कम दिली गेली. त्याला एका आठवड्याचे ५० लाख रुपये दिले जात होते.

बिग बॉस ८ मध्ये करिश्मा तन्ना 
करिश्मा तन्ना शोची अंतिम स्पर्धक होती पण ती जिंकू शकली नाही. तरी तिने शोच्या विजेता गौतम गुलाटीपेक्षा अधिक कमाई केली. कारण करिश्माला दर आठवड्याला १० लाख रुपये मिळत, ते गौतमपेक्षा जास्त होते.

बिग बॉस ७ मध्ये तनिषा मुखर्जी 
बिग बॉसच्या घरात तनिषा मुखर्जींचा अत्यंत कमी काळ होती. तिला दर आठवड्याला साडेसात लाख रुपये मिळत असत , जे विजेता गौहर खानपेक्षा जास्त होते.

बिग बॉस १० मध्ये राहुल देव 
बिग बॉस १० च्या घरात राहण्यासाठी राहुल देव यांना २ कोटी रुपये देण्यात आले. तर विजेत्या मनवीर गुर्जरची बक्षीस रक्कम केवळ ४० लाख रुपये होती.

बिग बॉस १० मधील बानी जे 
या मोसमातील फायनलिस्ट बानी जेलाही मनवीर गुर्जरपेक्षा जास्त पैसे देण्यात आले. मनवीरने बक्षिसामध्ये ४० लाख रुपये जिंकले तर, बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी बानी जे यांना १.५५ कोटी रुपये देण्यात आले.

बिग बॉस ४ मधील पामेला अँडरसन 
पामेला अँडरसन बिग बॉस ४ च्या घरात पाहुणे म्हणून आली होती. बिग बॉसच्या घरात तिने फक्त ३ दिवस घालवले असतील पण कमाईच्या बाबतीत ती अव्वल स्थानी होती. हॉलीवूड स्टार स्टार पामेलाला केवळ ३ दिवसांसाठी बिग बॉसचा भाग होण्यासाठी अडीच कोटी रुपये देण्यात आले.

You might also like