मंदाना करीमीचा निर्मात्यावर शोषणाचा आरोप, अभिनेत्री म्हणाली – ‘मी चेंज करत होते अन्…’

पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक, अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी (Mandana Karimi) आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मंदानाचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच मंदानाचा सेमी न्यूड फोटो समोर आला, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसला. पुन्हा एकदा करीमीने निर्मात्यावर शोषण केल्याचा आणि छेडछाड केल्याचा आरोप केल्यानं चर्चेत आली आहे. कोका कोला सिनेमाच्या निर्मात्यावर तिनं हे आरोप केले आहेत. एका मुलाखतीत तिनं याबाबत भाष्य केलं आहे.

https://www.instagram.com/p/CH7DTAWppYc/

मुलाखतीत बोलताना मंदाना म्हणाली, दिवाळीच्या एक दिवस आधी झालेल्या या घटनेनं मला धक्का बसला. गेल्या वर्षभरापासून आम्ही कोका कोला सिनेमावर काम करत आहोत. हे एक असं काम होतं, ज्याची टीम प्रोफेशनल नाही हे माहीत असूनही तुम्ही काम करता.

https://www.instagram.com/p/CHuAP6JplkP/

मंदानानं सांगितल्यानुसार, या क्रूसोबत काम करण्यासाठी सुरुवातीपासूनच अडचण होती. निर्माता महेंद्र धारीवाल (Mahendra Dhariwal) जुन्या विचारांचा माणूस आहे. तो सेटवर पुरुष केंद्रित आणि अहंकारग्रस्त जागा बनवतो.

https://www.instagram.com/p/CHcyi_Eptq2/

मंदाना म्हणाली, शूटिंगचा शेवटचा दिवस होता. मी माझं काम संपवून जायच्या तयारीत होते. मला कुणाला तरी भेटायला जायचं होतं. शूट संपण्याआधी निर्मात्यानं मला एक तास थांबवण्यासाठी सांगितलं. शूटनंतर चेंज करण्यासाठी मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले आणि स्पॉटबॉयला सांगितलं की, कुणाला आत येऊ देऊ नको.

https://www.instagram.com/p/CHetM-CpiYP/

मी कपडे बदलत असताना धारीवाल आत आला. मी त्याला बाहेर जाण्याची विनंती केली. परंतु तो गेला. उलट माझ्यावर चिडू लागला. तू जाऊ शकत नाही. मी तुला एक तास एक्स्ट्रा काम करायला सांगितलं आहे. तुला हे करावं लागेल, कारण मी निर्माता आहे. मी यासाठी तुला पैसे दिले आहेत.

https://www.instagram.com/p/CHcbmEhp9uJ/

मंदाना सांगते, निर्मात्यानं मुलासोबत मिळून तिथं तमाशा केला. बरं झालं की, तिथं स्टायलिस्ट हितेंद्र उपस्थित होते आणि वाद वाढण्याआधीच त्यांनी धारीवाल याला बाहेर काढलं.

मंदानानं केलेल्या आरोपांनंतर धारीवाल यानेही यावर स्पष्टीकरण देत बाजू मांडली आहे. आम्ही मंदानाला 7 लाख रुपये देऊन साईन केलं होतं. परंतु शूटिंग सुरू झाल्यावर तिचे नखरे सुरू केले. शूट दिल्लीत सुरू होतं आणि तिला एक दिवसासाठी परत जायचं होतं. तेव्हा तिनं 2 लाखांची मागणी केली.

https://www.instagram.com/p/CHXxiSNp8Su/

सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाबाबत बोलताना धारीवालनं पुढं सांगितलं की, तिची शिफ्ट सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत होती. तिला 8 वाजताच जायचं होतं. मी तिला हे समजवायला गेलो होतो की, शूटिंगला आणखी उशीर करू शकत नाही. मी तिच्या मागे व्हॅनिटीमध्ये गेलो. ती समजूनच घेत नव्हती आणि पॅकअप करू लागली.

https://www.instagram.com/p/CGkSkTAJ4Go/

धारीवालनं असंही सांगितलं की, मी तिच्या वागण्यानं नाराज झालो आणि ओरडलो. यावर मंदानानं माझा व्हिडिओ काढणं सुरू केलं. ती व्हॅनिटीत गेल्यानंतर 10 ते 15 सेकंदांत मी गेलो होतो. आत जाण्याआधी मी दारही वाजवलं होतं. तिनं मला आत येण्यास सांगितलं होतं. मी तिला एक्स्ट्रा काही मिनिटे देण्यास सांगितली, परंतु तिनं नकार दिला.

https://www.instagram.com/p/CFuXt19J0dL/