‘ही’ मॉडेल ग्लॅमरच्याबाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींना ‘टक्कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 11 ची सर्वात ग्लॅमरस स्पर्धक असलेली बंदगी कालराचे काही लेटेस्ट फोटो सोशलवर सध्या धुमाकूळ घालत आहेत. बंदगी आधीपासूनच स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. बिग बॉससारखा मोठा फ्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मात्र बंदगी स्टार झाली. यानंतर तिच्या पर्सनॅलिटीतही खूप बदल झाल्याचे दिसून आले.

बंदगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. ज्यांनी सोशलवर धुमाकूळ घातला आहे. बंदगीच्या फोटोमध्ये तुम्ही तिचा ग्लॅमरस अंदाज पाहू शकता. बंदगीचा आउटफिट असो किंवा अॅटीट्यूड तिचा हरएक अंदाज हा हटके असतो आणि चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत असतो.

ब्लॅक आउटफिटमधील बंदगीचा अलग टशन तुम्ही पाहू शकता. तिचे हे कूल फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. बंदगीच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला गॉर्जियस म्हटलं आहे तर काहींनी तिला स्टनिंग म्हटलं आहे.

बंदगी नेहमीच आपल्या लुकसोबत एक्सपेरिमेंट्स करत असते. तिला कधीच कसली भीती वाटत नाही. तिचा हा बिंधास्त अंदाज तुम्ही बिग बॉस 11 मध्येही पाहिला असेल. बंदगी मेकअपच्या वेगवेगळ्या टेक्निकही आत्मसात करत असते.

बंदगी लवकरच एका रिजनल सिनेमातून डेब्यू करणार आहे. बंदगीने दोन तेलगू सिनेमे साईन केले आहेत. ग्लॅमर फिल्डमध्ये येण्याआधी बंदगीने सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉबही केला आहे. तिने मॉडेलिंगही केलं आहे.

खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, बंदगी बिग बॉस फेम पुनीश शर्माला डेट करत आहे. शोमध्येच दोघांचं अफेअर सुरु झालं होतं. सलमानच्या रिअॅलिटी शोमध्ये पुनीश आणि बंदगीला रोमँटीक होताना अनेकदा पाहिले आहे.