अभिनेता अस्ताद काळेला मिळेना काम ? शेअर केली ‘ही’ पोस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मनोरंजन क्षेत्रावरही याचा परिणाम झाला. अनेक मालिका आणि सिनेमाचं काम बंद पडलं. अनेक कलाकारांकडे कामही नाही. अभिनेता अस्ताद काळे (Astad Kale) हाही कामाच्या शोधात आहे. अस्तादनं सोशलवर एक पोस्टही शेअर केली आहे.

अस्तादने पोस्ट शेअर करत लिहिलं की, नमस्कार मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे. माझ्या योग्य भूमिका असल्यास नक्की विचार करा. अस्तादनं फेसुबकवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

अस्तादची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहते त्यावर कमेंट करू लागले. अनेकांनी त्याला लवकरच काम मिळेल, असं म्हणत त्याच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. अस्तादची ही पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होत असून चर्चेत आहे.

अस्तादच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर पुढचं पाऊल या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता. यानंतर त्यानं अनेक मालिकेत काम केलं आहे. अलीकडेच त्याने सिंगिंग स्टार या रिअ‍ॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. अंतिम फेरीपर्यंत जाण्यात त्याला यश आलं होतं. बिग बॉस मराठीमध्येही तो दिसला होता.

You might also like