चाहत्यानं केला Bigg Boss फेम विकास गुप्ताच्या ‘सेक्शुअलिटी’वरून सवाल ! मास्टरमाईंडनं दिलं मजेदार उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बिग बॉस 11 चा मास्टरमाईंड विकास गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतीच त्यानं इंस्टावरून चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका युजरनं त्याला खूप विचित्र प्रश्न विचारला. विकासनं न रागावता मजेदार उत्तर दिलं आहे.

विकास गुप्ताच्या सेक्शुअलिटीवरून सवाल
Ask me a question या सेशनमध्ये एका युजरनं विकासला विचारलं की, तू पुरुष आहेस का ? यावर विकासनं म्हणाला, “नाही मी इच्छाधारी साप आहे जो आता माणासाच्या रूपात आहे. असं बोल्यानंतर विकास गुप्तानं सापा प्रमाणे जीभेनं इशाराही केला.

दरम्यान विकासच्या सेक्शुअलिटीवर प्रश्न उपस्थिती होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याधीही असं झालं आहे. बिग बॉस 13 मध्येही विकास गुप्ता गेस्ट म्हणून आला होता. आसिम रियाजनं इशारे करत विकासच्या सेक्शुअलिटीवरून कमेंट केली होती. यावर विकासनं खूपच नाराजी व्यक्त केली होती. टीव्ही अ‍ॅक्टर पार्थ समथान सोबतही विकासचं नाव जोडलं गेलं आहे. एकता कपूरनं दोघांचं रिलेशनशिप कंफर्म केलं होतं. विकास आणि पार्थ यांच्यातील वाद खूप मोठा होता.