PHOTOS : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं ‘गुपचूप’ उरकला ‘साखरपुडा’ ! ‘या’ ‘मिस्ट्री मॅन’सोबत करणार लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हरियाणवी डान्सर, सिंगर आणि बिग बॉस स्पर्धक तसेच एक बॉलिवूड स्टार सपना चौधरी हिच्या आयुष्यात लवकरच एक सोनेरी वळण येणार आहे. आपल्या अनेक चाहत्यांचं मन मोडत सपना चौधरी विवाहबद्ध होणार आहे. नक्की कोणावर सपना लट्टू झाली आहे हे आपण जाणून घेऊयात.

https://www.instagram.com/p/B9bfcqCJOpc/

मीडिया रिपोर्टनुसार सपना चौधरी हरियाणाच्या ‘वीर साहू’ याला डेट करत आहे. वीर साहू हा हरियाणाचा बब्बू मॅन म्हणूनही ओळखला जातो. वीर साहू एक सिंगर आणि अ‍ॅक्टर आहे. त्याचे अद्याप अनेक म्युझिक व्हिडीओ आले आहेत.

https://www.instagram.com/p/B5ukvzXJMI4/

आजकाल सर्वांच्या तोंडावर सपना आणि वीर यांच्या अफेअरच्या चर्चा होताना दिसत आहेत. असं सांगितलं जात आहे की, लवकरच दोघं लग्न करण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीत सपनानं वीर साहू याचं कौतुकंही केलं आहे. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना सपना म्हणाली, “वीर स्वच्छ मनाचा आहे. आम्ही 2015-16 मध्ये एका अवॉर्ड शोमध्ये भेटलो होतो. पहिल्यांदा त्याला पाहिल्यानंतर मला तो खडूस वाटला होता. यानंतर पुन्हा अवॉर्ड शोमध्ये आमची भेट झाली होती. नंतर थोडं बोलणं झालं होतं.”

यानंतर वीर आणि सपना यांच्यात बोलणं ही वाढू लागलं. हळूहळू मैत्री वाढली आणि याचं रुपांतर प्रेमात झालं. अशाही बातम्या येत आहेत की, दोघांनी साखरपुडाही उरकला आहे. परंतु ही गोष्ट त्यांनी सिक्रेट ठेवली आहे. अद्याप दोघांपैकी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु दोघांच्या लग्नाबद्दल सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3cZF7Xp4lW/

https://www.instagram.com/p/BuYvNfyHsZa/

https://www.instagram.com/p/BspQ4XvjG9g/

https://www.instagram.com/p/BpE1xnfgc2s/