बिग बॉस फेम शिल्पा शिंदे दिसणार बोल्ड लूकमध्ये, फोटो होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लहान पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉसच्या (Bigg Boss) 11 व्या सीझनची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसे कारण देखील आहे. टेलिव्हिजननंतर शिल्पा शिंदे डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहे. शिल्पा शिंदेची (Shilpa Shinde) पौरषपूर ही वेब सीरिज लवकरच ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यामध्ये शिल्पा राणी (Queen) मीरावतीच्या (Meerawati) भूमिकेत दिसणार आहे. पौरषपूरच्या (Paurashpur) निमित्ताने बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना मिस्ट्री आणि सस्पेन्स हा जॉनर एकत्र पहायला मिळणार असून यामध्ये शिल्पाचा लूक अतिशय वेगळा आहे.

शिल्पा शिंदेला आजपर्यंत निगेटिव्ह आणि कॉमेडी भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण पहिल्यांदाच तिने एका राणीची भूमिका साकारली असून याचा टीझर रिलीज झाल्यानंतर मिलिंद सोमणच्या लूकच्यीही खूप चर्चा झाली. या वेब सीरिजमध्ये शिल्पा शिंदे अतिशय बोल्ड (Bold Photo) अवतारात दिसणार आहे. सध्या तिचे फोटो प्रचंड व्हायरल (Viral) होत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिल्पा गँग्ज ऑफ फिल्मिस्तानमधून कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. मात्र तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला. मेकर्ससोबत झालेल्या भांडणामुळे तिने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

पौरषपूरमध्ये अन्नू कपूर (Annu Kapur) राजा भद्रप्रताप सिंहच्या भूमिकेत आहेत. तर मिलिंद बोरीसच्या भूमिकेत आहे.

शिल्पा आणि शहीर शेख यांच्यातही यात मुख्य भूमिका आहेत. सत्तेची लढाई, वासना, रक्ताने माखलेल्या तलवारी, युद्ध, कपट, राजकारण अशी पार्श्वभूमी असलेल्या वेबसीरजमध्ये अन्नू कपूर यांनी एका वासनांध राजाची भूमिका साकारली आहे. त्याच्या राज्यात महिलांना केवळ भोगाची वस्तू मानले जाते. पुरुषाच्या कोणत्याही मागणीला नकार देण्याचा अधिकार महिलांना नाही. ही वेब सिरीज येत्या 29 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.