‘बोल्ड’ अ‍ॅक्ट्रेस स्मिता गोंदकर ‘या’ देशात एन्जॉय करते व्हॅकेशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘बिग बॉस मराठी’ सीझन १ मधील स्मिता गोंदकर हे नाव चर्चेत आले आहे. ‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकरने विविध चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ती तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही नेहमी चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

नुकतेच स्मिता गोंदकरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. सध्या ती ऑस्ट्रियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर ऑस्ट्रिया ट्रिपचे फोटो शेयर केले आहेत.

स्मिता गोंदकरने काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेत दिलेल्या मुलाखतीत हॉलिवूडमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले व पुढे म्हणाली की, कलाकारांनी कधीच स्वतःला सीमित ठेवले नाही पाहिजे. कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न पूर्ण करणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like