Bigg Boss 13 : ‘भाईजान’ सलमानच्या ‘दबावा’खाली हिमांशी आसिमला म्हणाली होती ‘I Love You’ ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस सीजन 13 मध्ये अनेक स्पर्धक प्रेमात पडल्याचं दिसून आलं. काहींचं नातं तर एवढं पुढे गेलं की, लग्नच्या गोष्टी सुरू झाल्या. असाच स्पर्धक आहे आसिम रियाज जो बिग बॉसच्या घरात हिमांशी खुरानाच्या प्रेमात पडला. आसिम हिमांशीसाठी एवढा पागल झाला की, त्यानं शोमध्येच तिला लग्नासाठी प्रपोज केलं.

आसिमनं आपल्या फीलिंग्स हिमांशीला सांगितल्या. परंतु हिमांशीनं त्यावेळी कोणतीही कमिटेमेंट करण्यासाठी नकार दिला. तिनं विचार करण्यासाठी वेळ मागितला होता.

हिमांशीचं व्हिडीओ व्हायरल
हिमांशी खुरानाचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. आसिमसोबत नातं पुढे नेण्याआधी तिला दोन्ही कुटुंबासोबत बोलयाचं असल्याचं तिनं सांगितलं आहे. हिमांशी म्हणते, “माझ्या आणि आसिमच्या नात्याबद्दल मला दोन्हीही कुटुंबासमोर सर्वकाही स्पष्ट करायचं होतं. परंतु सलमाननं शोदरम्यानच सवाल उपस्थित केल्यानं मी या नात्याला होकार दिला.”

https://www.instagram.com/p/B8GsGexBx9l/?utm_source=ig_embed

दबावात हिमांशीनं आसिमला होकार दिला ?
हिमांशीचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. असे सवाल उपस्थित होत आहेत की, हिमांशीचं खरंच आसिमवर प्रेम आहे की, ती दबावात येऊन सलमान समोर होकार दिला आहे. घराच्या बाहेरही दोघांची जोडी वादात राहिली आहे. जेव्हा स्टोरीमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड श्रृती तुलीची एन्ट्री झाली तेव्हा तर असंह म्हटलं गेलं की, आसिमचं श्रृतीसोबत अजूनही नातं कायम आहे.