साऊथची ‘मलायका’ हिना पांचाळच्या ‘मादक’ फोटोंनी चाहते ‘घायाळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री हिना पांचाळ अभिनेत्री हिना पांचाळ हिला आपण सर्वच ओळखतो. हिनानं बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. साऊथची मलायका अरोरा म्हणून ओळखली जाणारी हिना पांचाळ आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

हिनानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच बोल्ड आणि मादक दिसत आहे. आपल्या फोटोंनी हिनानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिना पांचाळ हे नाव हिंदी, तमिळ आणि तेलगू सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. हिनानं सिनेमात जास्त काम केलं नसलं तरी तिनं अनेक आयटम नंबर्स केले आहेत.

बॉम्बे टाईम्स मासिकातील टॉप 10 बॉलिवूड आयटम गर्ल्सच्या यादीत हिना सातव्या क्रमांकावर होती. याशिवाय 2015 च्या फोर्ब्स इंडियाच्या यादीतील 100 सेलेब्रिटींमध्ये हिनाचा समावेश होता. हिना अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून जास्त फेमस आहे. हिना आपल्या फिटनेसला घेऊन खूप जागरूक आहे. मलायकाच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता चेहरा असणारी हिना पांचाळ मलायकाची Look-ALike म्हणून फेमस आहे. मलायकाप्रमाणेच ती फिट आहे. हिना अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिनं अनेक साऊथ सिनेमात आयटम साँग केले आहेत. मोहल्ला, हुक्का, बोगन, राजू ओ राजू, बेबो बेबो असे काही तिचे सिनेमे सांगता येतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/