‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ‘बिग बॉस २’ मध्ये एका नवीन स्पर्धकाचे आगमन झाले आहे. महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिना पांचाळचे नाव घोषित केले. आणि तिने स्टेजवर धमाकेदार आगमन केले. दरम्यान शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली आहे. आणि लगेचच हिना पांचाळचे बिग बॉसमध्ये आगमन केलं आहे.

दरम्यान मागील काही दिवसापासून शिवानी सुर्वेला घराबाहेर जायचे आहे, हि चर्चा चालू होती. आणि काल अखेर ती बिग बॉस २ च्या घरातून बाहेर पडली. तिला बिग बॉसच्या  घरात खूप मानसिक त्रास होत होता. असे ती म्हणत होती त्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून  बाहेर पडली.

हिना ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. परंतु ती  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासारखी दिसते. हिनाने  तिचे फिल्मी करिअर २०१४ साली सुरू केले होते. त्यांनतर  २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा समावेश झाला होता. अनेक दक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. तिला अभिनेत्री ऐवजी आयटम गर्ल म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत.

https://www.instagram.com/p/ByAuu7kBGhZ/?utm_source=ig_web_copy_link

हिना ही सोशल मीडियावरही  खूप एक्टिव आहे. ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो कायम शेअर करत असते. अशा या हॉट आणि सेक्सी आयटम गर्लने बिग बॉस २ मध्ये एंट्री मारली आहे.

Loading...
You might also like