उत्सुकता शिगेला ‘या’ दिवशी सुरु होणार ‘बिग बॉस मराठी २’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी बिग बॉस नंतर बिग बॉस मराठीचा पहिला सिझन देखील खूप गाजला. आता बिग बॉसच्या फॅन्स साठी खुशखबर आहे. उत्सुकता असलेल्या ‘बिग बॉस मराठी सिझन २’ येत्या १९ मे पासून सुरु होणार आहे. या सिझनचे होस्टिंग महेश मांजरेकर करणार आहेत. आता या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांमुळे तारखा पुढे ढकलल्या
‘बिग बॉस’ मराठी च्या नव्या सीझनची घोषणा झाल्यानंतर हा सीझन कधी होणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला होती. १४ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान हा शो सुरू होणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकांमुळे या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर मे महिन्यात शो सुरू होण्याची चर्चा होती. अखेर ‘बिग बॉस मराठी २’ चा पहिला एपिसोड रविवार १९ मे या दिवशी टीव्हीवर दिसणार आहे. रविवारी शोचे प्रमिअर असेल ज्या भागात सर्व सहभागी कलाकारांची ओळख करून दिली जाईल. या भागाच्या चित्रीकरणाला १६ मेपासून सुरूवात होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

कोण कोण होणार सहभागी ? उत्सुकता शिगेला
‘बिग बॉस’च्या या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची जोरदार चर्चा मात्र आता रंगली आहे. त्यात, वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या काही प्रोमोंमुळे उत्सुकता जास्त वाढली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याविषयी प्रत्येक जण आडाखे बांधतो आहे. येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे.

रामदास आठवले तसेच  सहभागी होणार ?
बिग बॉस मराठी सिझन २ संदर्भात काही प्रोमो रिलीज करण्यात आले होते. यावरून लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर तसेच कविमनाचे नेते रामदास आठवले यांचा सहभाग असणार यावरून चर्चांना उधाण आले होते. मात्र यंदाच्या सीझनमध्ये नक्की कोण सहभागी होणार हे येत्या १९ तारखेलाच समजणार आहे.

Loading...
You might also like