बिग बॉस मराठी-2 : अमरावतीचा शिव ठाकरे ठरला विजेता

पोलीसनामा ऑनलाईन टीम – संबंध महाराष्ट्राला अतिशय उत्सुकता लागून राहिलेल्या छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी-२ चा महाअंतिम सोहळा आज पार पडला. सुरवातीपासूनच चर्चेत असेलला अमरावतीचा शिव ठाकरे हा अंतिम विजेता ठरला आहे. रविवारी सायंकाळी सातपासून महाअंतिम सोहळा चांगलाच रंगला होता. या महाअंतिम सोहळ्यात अनेक स्पर्धकांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले.

Shiv-and-Veena

सुरवातीपासूनच चर्चेत असेलला अमरावतीचा शिव ठाकरे हा अंतिम विजेता ठरला आहे. या महाअंतिम फेरीत नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले होते.

Veena Jagtap

मागच्या तब्बल १०० दिवसांपासून हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहात होते. या शो वरून अनेक वादही निर्माण झाले होते. ‘रोडीज’ या रियालिटी शो पासून तो चांगलाच चर्चेत होता आलेला शिव ठाकरे या स्पर्धेचा दावेदार मानला जात होता. तो बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्याची वीणा जगताप सोबतची मैत्री चांगलीच चर्चेत आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –