Bigg Boss Marathi 2 : सर्वांची मने जिंकणाऱ्या सुरेखा पुणेकर घरातून ‘Exit’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठी 2 मधून सुरेखा पुणेकर यांना घराबाहेर जावं लागलं आहे. या आठवड्यात हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे नॉमिनेशनमध्ये होते. सुरेखा पुणेकर आणि वैशाली म्हाडे या दोघी डेंजर झोनमध्ये होत्या. सुरेखा पुणेकर यांना कमी मतं मिळाल्याने घराबाहेर जावं लागलं. संपूर्ण महाराष्ट्रीची मने जिंकणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी घरातील स्पर्धकांची आणि प्रेक्षकांचीही मने जिंकली.

सुरेखा पुणेकर यांना बाहेर पडताना महेश मांजरेकर यांना सुरेखाताईंना एक विशेष अधिकार दिला. त्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला अनसेफ करायचे होते. परंतु असे करण्यास सुरेखाताईंनी स्पष्ट नकार दिला. सुरेखा ताई बाहरे पडण्याआधी त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. सुरेखा ताई घरातून बाहेर जाताना सगळेच सदस्य भावूक झाल्याचे दिसले. सुरेखाताईंनी घरातल्या सदस्यांना नृत्याचे धडे दिले होते, त्यांनी लावणीही सादर केली होती. सर्वांनी मिळून खूप मज्जा-मस्ती केली. सदस्यांनी या सर्व गोष्टी नेहमीच आठवत राहतील.

एकदा घरात, एकच फाईट वातावरण ताईट या कार्याचे आयोजन करण्यात आले होते. यातून महेश मांजरेकरांनी सदस्यांना आपल्या मनातील राग काढण्याची संधी दिली होती. यावेळी माधवने वीणा आणि नेहाबद्दल तर शिवनेही नेहा आणि हिनाबद्दल राग व्यक्त केला. वैशालीनेही किशोरी आणि नेहाबद्दलचा राग व्यक्त केला. रुपाली आणि वीणाने किशोरी यांचे नाव घेतल्याने इतर सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. किशोरी यांनाही याचं थोडं वाईट वाटलं.

आता घरामध्ये नवीन कॅप्टन कोण होईल, पुढील आठवड्यात कोण बाहेर जाईल तसेच इतर सदस्यांना मिळणारे टास्क असं सर्व काही पाहणं रंजक असणार हे मात्र नक्की.

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर