Bigg Boss Marathi फेम अभिनेत्री सई लोकूर विवाहबद्ध ! (फोटो)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बॉस मराठी 1 (Bigg Boss Marathi 1) फेम अ‍ॅक्ट्रेस सई लोकूर (Sai Lokur) विवाहबद्ध झाली आहे. सईनं तीर्थदीप रॉय (Tirthadeep Roy) याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, सोशलवर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आज (सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020) अखेर तिनं लग्न केलं आहे. आज सकाळी 9.45 वाजता सई लोकूर (Sai Lokur) आणि तीर्थदीप रॉय यांचा पारंपरिक विवाहसोहळा पार पडला.

सई आणि तीर्थदीप यांनी 2 ऑक्टोबर रोजी साखरपुडा केला होता. त्यावेळी सई तीर्थदीपसाठी खास पोस्टही लिहिली होती. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली होती. तिची ही पोस्ट सोशलवर व्हायरल झाली होती.

सई आणि तीर्थदीप याच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर एका मॅट्रीमोनियल वेबसाईटवरून दोघांची ओळख झाली होती. सईनंच याबाबत सांगितलं होतं. एका मुलाखतीत सई म्हणाली की, गेल्या 2 वर्षांपासून मी मॅट्रीमोनियल वेबसाईटवर माझ्या मिस्टर परफेक्टला शोधत होते. माझी आणि तीर्थदीपची ओळखही एका मॅट्रीमोनियल वेबसाईटवरूनच झाली. ऑगस्टपासून आम्ही बोलायला सुरुवात केली. काही दिवसांत आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला.

पुढं सई म्हणाली, तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीत आमचं लग्न ठरलं. खूप घाईत सर्व काही झालं. मला मनापासून असं वाटत आहे की, माझ्यासाठी हेच नातं असावं.

 

You might also like