Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात ‘या’ कलाकारांनी घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी मध्ये प्रेक्षकांना उत्सुकता होती ती म्हणजे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदमच चार वाईल्ड कार्ड एंट्री होणार होत्या. यामध्ये कोण असणार आणि घरातल्यांची त्यांच्या प्रति कशी रिएक्शन असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर आता हे सागळे लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चार वाईल्ड कार्ड सदस्यांपैकी पहिले नाव आहे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विनर विशाल निकम तर एंटरटेनमेंट क्वीन म्हणून जिची ओळख आहे अशी अभिनेत्री राखी सावंत. आरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ यांनी आता बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री घेत खेळायला सुरुवात केली आहे. (Bigg Boss Marathi)

 

राखीच्या चाहत्यांना राखी मराठी बिग बॉस मध्ये देखील दाखल व्हावी अशी इच्छा होती. तर आता राखी सावंत मराठी बिग बॉसच्या घरात काय धुमाकूळ घालणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हिंदी बिग बॉस मध्ये देखील राखीने चाहत्यांचे खूपच मनोरंजन केले होते. आता या चार स्पर्धकाच्या एंट्रीने घरातील खेळात काय बदल होणार? नेमके कोणते स्पेशल पावर ह्यांना मिळणार? घरातील नाती बदलणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. (Bigg Boss Marathi)

राखीच्या येण्याने आता घरात काय नवीन वाद होतील हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
राखीने एन्ट्री घेतल्या घेतल्या तिने म्हटले की “शेवंते……… “आणि या तिच्या बोलण्याला अपूर्वाला हसू फुटले
त्यानंतर पुढे राखी म्हणाली “या सर्वांची आई आहे मी, बिग बॉस ची पहिली बायको, अंड्याची भुर्जी आणि
राखी सावंतची मर्जी इथे चालणार”. आता बिग बॉस अजून काय सरप्राईज घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर बिग बॉस मराठी च्या घरातून समृद्धी जाधवला काल बाहेर पडावे लागले.

 

Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi 4 ex contestants entry rakhi sawant wild card entry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Ajit Pawar – Raj Thackeray | आम्ही दोघे ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे बोलत नाही; अजित पवार राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल