×
Homeताज्या बातम्याBigg Boss Marathi | बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 4 वाईल्ड कार्ड...

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 4 वाईल्ड कार्ड एंट्री

पोलीसनामा ऑनलाईन : Bigg Boss Marathi | सध्या बिग बॉस मराठी चांगलेच वळण घेताना दिसत आहे. घरात घडणाऱ्या घडामोडींनी प्रेक्षकांना धरून ठेवले आहे. तर आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून पाच स्पर्धक बाहेर पडले आहेत. मात्र किरण माने घराच्या बाहेर पडून ही स्पेशल पावर मुळे घरातच आहेत. आता दरम्यानच्या काळात बिग बॉस मध्ये स्नेहलता वसईकरने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. तर आता सर्व स्पर्धकांना एक सरप्राईज येणाऱ्या काळात मिळणार आहे. (Bigg Boss Marathi)

आता पुन्हा एकदा नवीन स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. बिग बॉसच्या घरात आता 50 दिवस उलटून गेले आहेत आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळून एकमेकांशी भांडून स्वतःचे स्थान घरात टिकवून ठेवले आहे. मात्र आता पन्नास दिवसानंतर घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशाने सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत आणि अशातच बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नाही तर तब्बल चार स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहेत. (Bigg Boss Marathi)

बिग बॉसच्या एका प्रोमो मध्ये याची माहिती समोर आली आहे.
तर हे चारही स्पर्धक येणाऱ्या आठवड्यात घरात एन्ट्री घेताना दिसणार आहेत.
सध्या जरी या स्पर्धकांच्या एन्ट्री ने घरातील स्पर्धक चांगलेच खुश झाले असले तरी येणाऱ्या काळात यांच्यात होणारे
वाद पाहण्यासारखे असणार आहेत. या स्पर्धकांचे घरातील स्पर्धकांनी आनंदाने स्वागत करताना दिसत आहेत.
मात्र अजून तरी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणारे हे चार नवीन चेहरे नक्की कोण आहेत हे मात्र अजून
समोर आलेले नाही. मागच्या आठवड्यात घरामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत या सगळ्यांचा हिशोब शनिवार आणि रविवार मांजरेकर चावडीवर काढणारच आहेत. त्यात आता या नवीन स्पर्धकांच्या एंट्रीने यंदाची चावडी पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi 4 for the first time in the history there will be 4 wild card entries in the house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचे भाजप, मनसेवर टीकास्त्र, म्हणाल्या – ‘छत्रपतींवर छोटे सिनेमे सहन नाही करणार’

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News