पोलीसनामा ऑनलाइन टीम : Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात चांगलीच रंगत आल्याचे दिसत आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच चार वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे. त्यानंतर खेळामध्ये अजूनच चुरस आल्याचे दिसत आहे, तर प्रत्येक जण घरात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. नुकतीच घरातून तेजस्विनी बाहेर पडली तिच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तिला खेळातून मधूनच जावे लागले, तर आता बिग बॉसच्या घरात कॅप्टन पदाच्या उमेदवारीची नियुक्ती जोरात होताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi)
बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन पदाच्या उमेदवारीची नियुक्ती होणार आहे. यासाठी सदस्य अगदी मन लावून तयारी करताना दिसत आहेत. यासाठी घरात डान्स पार्टी अरेंज करण्यात आली होती. यावेळी सदस्यांनी आपल्या डान्सच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मन जिंकले होते, तर काहींचे डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यात किरण माने, विकास आणि अपूर्वा यांनी दाक्षिणात्य चित्रपट पुष्पातील सामी सामी गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला. यावर राखीनेदेखील त्यांची प्रशंसा केली होती, तर अमृता धोंगडे आणि विशाल निकम यांनीदेखील परफॉर्मन्स सादर केले होते, तर आता कॅप्टन सीसाठी घरात अजून एक कार्य पार पडणार आहे, ज्याचे नाव आहे मीटर डाऊन. (Bigg Boss Marathi)
या मीटर डाऊन टास्कसाठी स्पर्धकांना दोघांच्या टीम मध्ये खेळायचे आहे. घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले स्पर्धक देखील हा खेळ खेळताना दिसणार आहेत. या कार्याचे नेतृत्व रोहित शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर या कार्यादरम्यान मीरा जगन्नाथ आणि रोहित शिंदे मध्ये वाद होताना दिसत आहे. सध्या याच संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये मीरा आणि अक्षय एका टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. तर मीराला रोहित बाद करतो. मीरा चिडून करायचं तर दोघांना आऊट कर नाहीतर मी आऊट नाही होत जा असं म्हणत ती रोहितला चॅलेंज देते. तर मीराला विशाल ही सपोर्ट करत असतो. सध्या बिग बॉस ही सुट्टीवर असताना रोहितने मीरा सोबत केलेले वाद त्याला महागात पडणार का? हे येत्या काळातच समजेल हे मात्र नक्की…
Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi 4 mira jagannath and rohit shinde fighting during task
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ