Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा तो व्हिडिओ व्हायरल; राखी सावंतचा पदर पकडला अन्…

पोलीसनामा ऑनलाईन – Bigg Boss Marathi | सध्या बिग बॉस मराठी च्या घरात चांगलीच रंगत आल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण घरात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. या आठवडच्या सुरुवातीला ड्रामा क्वीन राखी सावंत हिने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. त्यानंतर बिग बॉसमध्ये अजून रंगत पाहायला मिळत आहे. ( Bigg Boss Marathi)

सध्या बिग बॉसच्या घरातील राखी सावंतचा आणि किरण मानेंचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आरडाओरडा करुन घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तितक्यात गार्डन एरियामधून किरण माने घरात येत “राखी काय झालं?” असं विचारताना दिसत आहेत. एवढ्यात अक्षय केळकर किरण मानेंना तुम्ही राखीच्या मागे झाडू मारुन दाखवा, असं म्हणतो.

अक्षय केळकरच्या या बोलण्याला राखी सावंतने उत्तर देताना म्हंटले “इथे हे झाडू मारायला नाही, डोळा मारायला आले आहेत”. त्यानंतर किरण माने राखी सावंतचा पदर पकडून संपूर्ण घरात तिच्या मागेमागे फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. राखी झाडू घेऊन घरात फिरत आहे. किरण माने व राखी सावंतचा हा मजेशीर व्हिडीओ सेलिब्रिटी प्रमोटर्स या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. तो जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात आणखी काय काय ड्रामा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi 4 rakhi sawant kiran mane funny video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

Pune Crime | 14 व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, 4 ठेकेदारांवर FIR; बाणेर मधील घटना