Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीमधून वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या ‘या’ स्पर्धकाला घ्यावा लागला घराचा निरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bigg Boss Marathi | सध्या बिग बॉस मराठीचे चौथे पर्व दिवसेंदिवस रोमांचक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना मनोरंजन करण्यात स्पर्धक कोठेही मागे राहताना दिसत नाहीत आणि अशातच एका मागून एक धक्के प्रेक्षकांना मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात बिग बॉसमधून तेजस्विनी लोणारी बाहेर पडताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर समृद्धी जाधव वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथदेखील स्पर्धेबाहेर पडले, तर त्यांच्याच बरोबर डॉक्टर रोहित शिंदेदेखील बाहेर पडला, तर या आठवड्यात पुन्हा एकदा वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या स्पर्धकाला बाहेर पडताना पाहून प्रेक्षकांनादेखील मोठा धक्का बसला आहे. (Bigg Boss Marathi)

 

या आठवड्यात अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, स्नेहलता वसईकर, प्रसाद जवाडे हे स्पर्धक नॉमिनेशन लिस्टमध्ये होते, तर घरातील सदस्यांच्या मते वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेली सदस्य स्नेहलता वसईकर ही काही करून घराबाहेर पडणार नाही याची गॅरंटी त्यांना होती. मात्र, या उलट झाल्याचे पाहायला मिळाले, तर या आठवड्यात बिग बॉस मराठीमधून स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) बाहेर पडली आहे.

प्रसादबद्दल अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. शेवटी जनतेच्या कृपेने तो पुन्हा एकदा सुरक्षित झाला. अनपेक्षितपणे स्नेहलताला बाहेर पडावे लागल्याने ती खूपच भावूक झाली होती. त्याचबरोबर घरातले सगळे सदस्यही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले, तर स्नेहलता जाता जाता म्हणाली, “मी कोणाला कळत न कळत दुखावले असेल तर मला माफ करा. कारण मी समोर एक आणि मागे एक बोलत नाही. जे आहे ते समोर बोलते”. आता येणाऱ्या काळात कोण स्पर्धक घरात टिकून राहील, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. (Bigg Boss Marathi)

 

Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi season 4 new update actress snehlata vasaikar evicted form the house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार